Corruption In Jal Jeevan Mission | जलजीवन योजनेत गैरव्यवहार; विधिमंडळ समितीकडून होणार तपासणी

0

Corruption In Jal Jeevan Mission | नगर : राज्यात शासनातर्फे जलजीवन योजनेच्या ( Corruption In Jal Jeevan Mission ) माध्यमातून प्रत्येक नागरिकांना घरोघरी पाणी देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य व केंद्र शासनातर्फे कोट्यावधींचा निधी देण्यात आला. मात्र, या कामात गैरव्यवहार झाल्याने जिल्हा परिषदेचे तसेच जल प्राधिकरणाचे काही अधिकारी कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील जलजीवन योजनेच्या कामात गैरव्यवहार झाल्याचे समोर आल्याने विधिमंडळाच्या अंदाज समितीची चाचपणी केली जाणार आहे. यासाठी ६ ते ८ ऑगस्ट दरम्यान या समितीकडून अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील कामांची पाहणी केली जाणार आहे.

हे वाचा – संगमनेर तालुक्यातील सातवा मैल फाट्याजवळ भीषण अपघात : भरधाव कारच्या धडकेत १६ वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू

अनेक गावात जलजीवनची कामे ( Corruption In Jal Jeevan Mission )

अहिल्यानगर जिल्ह्यात जलजीवन योजनेअंतर्गत सुमारे ९०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. आज अखेर जिल्ह्यात २७४ योजना पूर्ण झाल्या असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे. तसेच अनेक गावात जलजीवनची कामे झाले आहेत तर काही गावात ते अर्धवट असल्याचे ही दिसून येत आहे. तसेच या कामात अनियमेयता, मी तसेच निकृष्ट दर्जेचे काम झाले असल्याचा आरोप ही होत आहे.

नक्की वाचा : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून अहिल्यानगरमधील राजकीय, सामाजिक कामांचा आढावा

पायपेटी रोखण्यासाठी ही योजना ( Corruption In Jal Jeevan Mission )

मागील चार वर्षांपासून ही योजना रखडलेली आहे. नागरिकांना घर तेथे पाणी मिळावे यासाठी केंद्र सरकारने जलजीवन योजना सुरू केली आहे. दुष्काळग्रस्त भागातील महिलांची पाण्यासाठी होणारी पायपेटी रोखण्यासाठी ही योजना राबविण्यात आली होती. यासाठी प्रति व्यक्ती ५५ लीटर पाणी नागरिकांना मिळावे असे उद्दिष्ट शासनातर्फे ठेवण्यात आले आहे. मात्र, या योजनेत गैरव्यवहार झाल्याने अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे सहा अधिकारी व कर्मचारी व जीवन प्राधिकरणाचे चार अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

आता अहिल्यानगर जिल्हा परिषदेतील जलजीवन योजनेची विधिमंडळ समितीच्या वतीने तपासणी करण्यात येणार आहे यासाठी सहा ते आठ ऑगस्ट दरम्यान हे पथक अहिल्यानगर येथे दाखल होणार आहे. त्यामुळे या तपासणीत आणखी काही गैरव्यवहार समोर येतोय की काय तसेच हीच समिती काय अहवाल देते याकडे अहिल्यानगरकरांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here