Theft : पाथर्डी तालुक्याला चोरट्यांचे ‘ग्रहण’; आठवडाभरात सहा गुन्हे दाखल

पोलिसांची गस्त वाढवून चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

0
Theft : पाथर्डी तालुक्याला चोरट्यांचे 'ग्रहण'; आठवडाभरात सहा गुन्हे दाखल
Theft : पाथर्डी तालुक्याला चोरट्यांचे 'ग्रहण'; आठवडाभरात सहा गुन्हे दाखल

Theft : पाथर्डी : तालुक्यात चोरट्यांचा (Thieves) धुमाकूळ सुरूच असून, एका रात्रीत घरफोडी आणि जबरी चोरीच्या (Theft) दोन घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पिंपळगाव टप्पा येथे घरफोडी करून सव्वा लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला, तर माळी बाभळगाव येथे घराबाहेर झोपलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मणीमंगळसूत्र चोरट्याने जबरीने चोरून नेले. या दोन्ही प्रकरणी पाथर्डी पोलिसांनी (Pathardi Police) अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे आठवडाभरात चोरीचे एकूण सहा गुन्हे समोर आले आहेत.

नक्की वाचा : सुपा येथे ‘दहा कोटी नशा मुक्ती प्रतिज्ञा महाअभियान’ उत्साहात

१ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज लंपास

पाथर्डी तालुक्यातील पिंपळगाव टप्पा येथील शकिला बबन सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २ ऑगस्टच्या रात्री चोरट्यांनी घराच्या खोलीला बाहेरून लावलेले कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील सामान अस्ताव्यस्त करून लोखंडी कपाटातील ५० हजार रुपये रोख, सुमारे ११ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, तीन ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि चांदीचे पैजण असा एकूण १ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.दुसऱ्या घटनेत माळी बाभुळगाव येथील आश्राबाई दिवटे या घराच्या पोर्चमध्ये झोपलेल्या असताना पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणीमंगळसूत्र जबरीने काढून नेले. 

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी (Theft)

या वेळी चोरट्याने घरातील सदस्य झोपलेल्या खोलीला बाहेरून कडी लावल्याने कुटुंबीय तत्काळ बाहेर येऊ शकले नाहीत. आजीच्या आरडाओरडीनंतर शेजाऱ्यांच्या मदतीने कडी उघडण्यात आली; मात्र तोपर्यंत चोरटा पसार झाला होता. विशेष म्हणजे, मागील आठवड्यात पाथर्डी शहरातील खंडोबा माळ परिसरात दोन ठिकाणी घरफोडी, करंजी घाटात येथे दुचाकीवरून जाणाऱ्या दांपत्याला लुटण्यात आले.शिंगवे दत्ताचे येथे मध्यरात्री घरात घुसलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी महिलेचे तोंड दाबून तिच्या कानातील व गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेले. या झटापटीत महिलेच्या दोन्ही कानांना दुखापत झाली. या दोन जबरी चोरीच्या घटना घडल्या होत्या.

त्यानंतर अवघ्या काही दिवसांत पुन्हा एका रात्रीत घरफोडी व जबरी चोरीच्या दोन घटना घडल्याने आठवडाभरात चोरीचे एकूण सहा गुन्हे समोर आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, रात्रीची पोलीस गस्त वाढवून चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.