Nasha Mukti Pratigya Maha Abhiyan : सुपा येथे ‘दहा कोटी नशा मुक्ती प्रतिज्ञा महाअभियान’ उत्साहात 

वाढत्या व्यसनाधीनतेमुळे समाजावर गंभीर परिणाम

0
Nasha Mukti Pratigya Maha Abhiyan : सुपा येथे 'दहा कोटी नशा मुक्ती प्रतिज्ञा महाअभियान' उत्साहात
Nasha Mukti Pratigya Maha Abhiyan : सुपा येथे 'दहा कोटी नशा मुक्ती प्रतिज्ञा महाअभियान' उत्साहात

Nasha Mukti Pratigya Maha Abhiyan : पारनेर : सध्याच्या धावपळीच्या युगात वाढत्या व्यसनाधीनतेमुळे तरुण पिढी आणि समाज चिंतेच्या गर्तेत सापडला आहे. या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी आणि समाजात जनजागृती (Public Awareness) निर्माण करण्यासाठी सुपा येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या (Prajapita Brahmakumari Divine University) केंद्रातर्फे दहा कोटी नशा मुक्ती प्रतिज्ञा महाअभियानांतर्गत’ (Nasha Mukti Pratigya Maha Abhiyan) विशेष व्यसनमुक्ती प्रतिज्ञा व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

नक्की वाचा : शेतकऱ्यांच्या हितासाठी दर १५ किलोमीटरवर बाजारपेठ उपलब्ध करणार : अतुल लोखंडे

वाढत्या व्यसनाधीनतेमुळे समाजावर गंभीर परिणाम

सर्वांनी मिळून व्यसनमुक्त समाज घडविण्याचा संकल्प केला. व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम आणि मूल्याधिष्ठित जीवनशैली उपस्थित भाई , माता व नागरिकांना मार्गदर्शन करताना ब्रह्माकुमारी साधना दीदी यांनी सांगितले की, आजच्या काळात वाढत्या व्यसनाधीनतेमुळे विद्यार्थी, युवक तसेच संपूर्ण समाजावर अत्यंत गंभीर परिणाम होत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून व्यसनाधीनतेबाबत जागरूकता निर्माण व्हावी, त्यांनी मूल्याधिष्ठित जीवनशैलीचा स्वीकार करावा आणि एका निरोगी समाजाची निर्मिती व्हावी, याच उद्देशाने शिवदर्शनाच्या माध्यमातून प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयातर्फे ‘दहा करोड नशा मुक्ती प्रतिज्ञा अभियान’ देशभरात राबवले जात आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

आतापर्यंत ४ कोटी व्यक्तींपर्यंत पोहोचण्यात यश (Nasha Mukti Pratigya Maha Abhiyan)

पारनेर सेंटरच्या संचालिका ब्रह्माकुमारी साधना दिदी यांनी आपल्या मार्गदशनातून आजच्या काळातील सर्वात मोठ्या समस्येवर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या की, आज संपूर्ण भारत वर्तमान काळात प्रचंड ताणतणाव आणि टेन्शनमुळे त्रस्त झाला आहे. या मानसिक तणावातून बाहेर पडण्यासाठी अनेक व्यक्ती चुकीच्या मार्गाने व्यसनांच्या आहारी जातात; परंतु व्यसन केल्यामुळे टेन्शन कधीही कमी होत नाही, तर उलट ते आणखी वाढते.या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी प्रजापिता ब्रह्माकुमारी विद्यालयाने ६ ऑगस्ट ते २० ऑगस्ट दरम्यान ‘नशा मुक्त भारत अभियान’यशस्वीपणे राबवले आहे. या अभियानांतर्गत आतापर्यंत ४ कोटी व्यक्तींपर्यंत पोहोचण्यात यश आले असून, त्यापैकी तब्बल ३ कोटी लोकांनी व्यसनांना कायमचा रामराम ठोकून व्यसनमुक्त जीवन स्वीकारले आहे, ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची व गौरवाची बाब आहे.

उपस्थितांना व्यसनमुक्त राहण्याची प्रतिज्ञा

येत्या २५ ऑगस्ट रोजी विद्यालयाच्या मुख्य प्रशासिका दादी प्रकाशमनीजी यांच्या स्मृतीनिमित्त त्यांना खरी श्रद्धांजली तेव्हाच ठरेल, जेव्हा आपण सर्वजण मिळून या ‘नशा मुक्त भारत अभियानाचे’ रूपांतर एका जनआंदोलनात करू. हे अभियान विश्वरूप धारण करेल आणि खऱ्या अर्थाने आपला भारत देश पूर्णपणे ‘नशा मुक्त भारत’ बनेल, असा दृढ विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना व्यसनमुक्त राहण्याची आणि इतरांनाही प्रेरणा देण्याची प्रतिज्ञा देण्यात आली. कार्यक्रमाची वाच्यता आणि नियोजन अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात झाले.

ब्रह्माकुमारी साधना दीदी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक आणि अध्यात्मिक साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रेरणादायी कार्यक्रमास देवराम भाई, दिलीप भाई, लक्ष्मण भाई आणि बाळासाहेब पवार यांच्यासह प्रतिमा माता, सुनीता माता, मीना माता, सुषमा माता आणि पठारे माता आदींसह अनेक प्रमुख साधक उपस्थित होते.