Sangram Jagtap : सुनेत्रा पवार यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्टचा निषेध; संग्राम जगताप यांची काँग्रेसवर टीका

महिलेविषयी अशा प्रकारची भाषा वापरणे अत्यंत दुर्दैवी

0
Sangram Jagtap : सुनेत्रा पवार यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्टचा निषेध; संग्राम जगताप यांची काँग्रेसवर टीका
Sangram Jagtap : सुनेत्रा पवार यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्टचा निषेध; संग्राम जगताप यांची काँग्रेसवर टीका

Sangram Jagtap : नगर : काँग्रेसच्या सोशल मीडिया अकाउंटवरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याबाबत करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी तीव्र निषेध केला. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी काँग्रेस पक्षासह प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांच्यावरही जोरदार टीका केली.

नक्की वाचा : पाथर्डी तालुक्याला चोरट्यांचे ‘ग्रहण’; आठवडाभरात सहा गुन्हे दाखल

महिलेविषयी अशा प्रकारची भाषा वापरणे अत्यंत दुर्दैवी

काँग्रेस स्वतःला सुसंस्कृत पक्ष म्हणवून घेते. मात्र राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि एका महिलेविषयी अशा प्रकारची भाषा वापरणे अत्यंत दुर्दैवी आहे. महाराष्ट्राला सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांसारख्या महान महिलांचा वारसा लाभला आहे. अशा राज्यात महिलांबाबत अवमानकारक वक्तव्य करणे कोणत्याही परिस्थितीत योग्य नाही, असे जगताप म्हणाले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न (Sangram Jagtap)

ते पुढे म्हणाले, २०१४ पासून जनतेने काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवले आहे. लोकसभा, विधानसभा, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांतील पराभवानंतरही पक्षाने आत्मपरीक्षण केलेले दिसत नाही. उलट बेताल वक्तव्ये करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे.सोनिया गांधींचा उल्लेख करताना त्यांनी म्हटले, त्यांचा जन्म भारतात झाला नसला तरी देशातील जनतेने त्यांना स्वीकारले. त्यांच्या संदर्भात कोणीही अपमानास्पद भाषा वापरलेली नाही. त्यामुळे राजकीय मतभेद असले तरी वक्तव्य करताना तारतम्य राखणे आवश्यक आहे. पवार कुटुंबीयांबाबत अवमानकारक भाषा वापरण्याची काँग्रेसची पात्रता नसल्याचा आरोप आमदार संग्राम जगताप यांनी केले.