Samarpan Chaturmas : समर्पण चातुर्मासात रविवारी २.५ कोटी सामूहिक नवकार महामंत्र जाप कार्यक्रम

नवकार महामंत्र जाप हा ठरणार ऐतिहासिक क्षण

0
Samarpan Chaturmas : समर्पण चातुर्मासात रविवारी २.५ कोटी सामूहिक नवकार महामंत्र जाप कार्यक्रम
Samarpan Chaturmas : समर्पण चातुर्मासात रविवारी २.५ कोटी सामूहिक नवकार महामंत्र जाप कार्यक्रम

Samarpan Chaturmas : नगर : श्रद्धा, भक्ती आणि आत्मकल्याण असा त्रिवेणी संगम असलेला उपाध्याय प्रवर पूज्य प्रविणऋषीजी म.सा. यांचा समर्पण चातुर्मास (Samarpan Chaturmas) आनंदधाम परिसरात अतिशय भक्तीभावाने होत आहे. तब्बल १७ वर्षांनंतर पूज्य प्रविणऋषीजी महाराज (Pravin-Rishiji Maharaj) आपल्या गुरूदेवांच्या पावन भूमीत चातुर्मास करत असल्याने भाविकांमध्ये अलोट उत्साह पहायला मिळत आहे. आचार्यश्रीजी आनंदऋषीजी म.सा.यांच्या १२७ व्या जन्म जयंतीनिमित्त श्री गुरू आनंद जन्मोत्सव सप्ताह (Anand Janmotsav Week) साजरा होत आहे. याअंतर्गत उपाध्यायश्रीजींच्या सान्निध्यात रविवार दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७ ते १० यावेळेत आनंद तीर्थ समवशरण येथे सपरिवार २.५ कोटी नवकार महामंत्र जाप होणार आहे. २५ हजारांहून अधिक भाविक एकाचवेळी नवकार महामंत्राचा सामूहिक जाप करणार आहेत.

नक्की वाचा : मनपा कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला; मुकुंदनगरमध्ये नेमंक काय घडलं?

नवकार महामंत्र जाप हा ठरणार ऐतिहासिक क्षण

यावेळी मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे उपसचिव आय.ए.एस. सुधीर कुमार कोचर यांचे जाहीर व्याख्यान होणार आहे, अशी माहिती समर्पण चातुर्मास कमिटीचे अध्यक्ष अशोक (बाबूशेठ) बोरा, महामंत्री आदेश चंगेडिया व‌ कोषाध्यक्ष विलास कटारिया यांनी दिली. यावेळी महाराष्ट्र प्रवर्तक पूज्य कुंदनऋषीजी म.सा., पूज्य आलोकऋषीजी म.सा., पूज्य तिर्थेशऋषीजी म.सा., महासतीजी पूज्य सत्यप्रभाजी म.सा., महासतीजी पूज्य अमितज्योतीजी म.सा. आदी साधूसाध्वीजी उपस्थित असणार आहेत. २.५ कोटी नवकार महामंत्र जाप हा समर्पण चातुर्मासातील ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. भाविकांनी ग्लासभर पाणी सोबत आणायचे आहे. नवकार महामंत्र जापाची ऊर्जा या पाण्यात उतरते. अनुष्ठान झाल्यानंतर हे पाणी श्रद्धेने प्राशन करायचे आहे. नवकार महामंत्र आत्मशक्ती जागृत करणारा आणि वातावरण मंगलमय करणारा मंत्र आहे. या म़ंत्रामुळे निर्माण होणारी अद्भुत अशी सकारात्मक ऊर्जा अद्वितीय असणार आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

सकाळी ८ वाजता पारणा उत्सव (Samarpan Chaturmas)

आचार्यश्रींच्या पवित्र भूमीत होणारा हा कार्यक्रम संस्मरणीय ठरेल. जास्तीत जास्त भाविकांनी यात सहभागी होऊन समर्पण चातुर्मासात मनोभावे आराधना करावी.श्री गुरू आनंद जन्मोत्सव सप्ताहात सोमवार (ता. १०) ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी १.३० यावेळेत आनंद एकासन, मंगळवार दि.११ व बुधवार दि. १२ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता आनंद दया, बुधवार (ता. १२) ऑगस्ट रोजी दुपारी २ ते ४ यावेळेत तपस्वींचा सामूहिक भावा आणि रात्री ८ वाजता भक्ती संध्या कार्यक्रम होईल. आचार्यश्रींच्या जन्मजयंती दिनी गुरूवार (ता. १३) ऑगस्ट रोजी गुरू गुणानुवाद तसेच अट्ठाई प्रत्याख्यान होईल. शुक्रवार (ता. १४) ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता पारणा उत्सव होईल.

भाविकांना सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन

समर्पण चातुर्मासाचे मुख्य लाभार्थी अहिल्यानगरचे सुपुत्र, मुंबईचे सुप्रसिद्ध उद्योगपती तसेच तिरुपती बालाजी देवस्थानचे विश्वस्त सौरभ बोरा, प्रमिलाबाई बोरा, पराग बोरा व बोरा परिवार आहे. सामूहिक नवकार महामंत्र जाप व जन्मोत्सव सप्ताहातील कार्यक्रमांना भाविकांनी सहपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समर्पण चातुर्मास कमिटीचे अध्यक्ष अशोक बाबूशेठ बोरा, महामंत्री आदेश चंगेडिया, कार्याध्यक्ष राजेश भंडारी, कोषाध्यक्ष विलास कटारिया, उपाध्यक्ष अनिल पोखरणा, राजकुमार बोरा, विजय गुगळे, सुरेश कांकरिया, सचिन देसरडा, मनसुख गुंदेचा, सहसचिव अभय गांधी, अभिजीत गांधी व कमिटीच्या सर्व सदस्यांनी केले आहे.