Life-Threatening Attack : नगर : अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर (Mukundnagar) भागात महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला (Life-Threatening Attack) झाला आहे. शुक्रवारी (ता. 7) सायंकाळी घडलेल्या या घटनेत धीरजसिंग परदेशी (वय २२, रा. माधवबाग, भिंगार) गंभीर जखमी झाला आहे. मुकुंदनगर भागात पथदिव्यांची दुरूस्ती (Streetlight Repairs) करण्यासाठी तो गेला असता हा हल्ला झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे.
नक्की वाचा : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार; पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
लोखंडी पाईपने मारहाण
धीरजसिंग परदेशी हा महापालिकेच्या पथदिव्यांच्या देखभाल व दुरुस्तीचे कंत्राट असलेल्या ठेकेदार संस्थेमार्फत काम करतो. त्यानुसार तो इतर सहकाऱ्यांसोबत मुकुंदनगरातील दर्गा दायरा परिसरात पथदिव्यांच्या दुरुस्तीचे काम करत होता. तेव्हा त्याच्यावर हल्ला झाला. या घटनेनंतर भिंगार कँप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय कैलास मुळे (वय 24, रा. बोल्हेगाव, मूळ रा. आळकुटी, पारनेर) याच्या फिर्यादीवरून कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, मुकुंदनगर भागातील दर्गादायरा कब्रस्तानजवळ जुन्या वादातून एका तरुणावर लोखंडी पाईप आणि लाकडी बांबूने प्राणघातक हल्ला करण्यात आला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
राज्य राखीव दलाच्या तुकडीसह पोलिसांचा बंदोबस्त तैनात (Life-Threatening Attack)
7 ऑगस्ट रोजी दुपारी 4.10 वाजण्याच्या सुमारास आरोपी मेहराज अस्लम सय्यद, सिराज अस्लम सय्यद, मुस्तकिम अस्लम सय्यद, युनुस शेख आणि इतर दोन ते तीन अनोळखी व्यक्तींनी धीरज याला जीवे मारण्याच्या उद्देशाने गाठले. याला मारून टाका असे म्हणत आरोपींनी हातातील लोखंडी पाईप व लाकडी बांबूने धीरजला बेदम मारहाण केली. यानुसार भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 109(1), 189(2), 190, 191(2)(3) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक तेजश्री थोरात करीत आहेत. यातील एक आरोपी युनुस खानसाहब शेख (वय 48) याला शनिवारी पहाटे अटक करण्यात आली. त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले. या घटनेचे पडसाद उमटू नयेत, यासाठी पोलिसांनी दक्षता घेतली आहे.
राज्य राखीव दलाच्या तुकडीसह पोलिसांचा बंदोबस्त काही ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक मुम्माका सुदर्शन स्वतः यावर देखरेख ठेवून असून रात्री त्यांनी रुग्णालयात आणि घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांना तपासासंबंधी सूचना केला. नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.



