Pathardi Police Station : पाथर्डी : तालुक्यातील साडेतेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे कथित अपहरण (Kidnapping) करून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका युवकाविरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात (Pathardi Police Station) पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल (Case Registered) करण्यात आला आहे.
नक्की वाचा : अहिल्यानगर जिल्ह्याचे मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेचे काम पूर्णत्वाकडे
जीवे मारण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याचा आरोप
दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडित मुलीचे आई-वडील ऊसतोड मजूर असून ते हंगामी कामासाठी बाहेरगावी जात असतात. ऊसतोडीसाठी कामगार पुरविणाऱ्या मुकादमाच्या मुलाची पीडितेशी ओळख झाली होती. मार्च २०२६ मध्ये आरोपीने पीडित मुलीला घरातून जबरदस्तीने घेऊन जाऊन एका ठिकाणी ठेवले. तेथे तसेच त्यानंतर पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील न्हावरा येथे नेऊन जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
अनोळखी महिलेच्या मोबाईलवरून आईशी संपर्क (Pathardi Police Station)
दरम्यान, १ ऑगस्ट रोजी पीडित मुलीने एका अनोळखी महिलेच्या मोबाईलवरून आईशी संपर्क साधून आपण न्हावरा येथे असल्याची माहिती दिली. त्यानंतर २ ऑगस्ट रोजी तिचे आई-वडील तेथे जाऊन तिला घरी घेऊन आले. घरी आल्यानंतर मुलीने आपल्यासोबत घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी आरोपी विरुद्ध बलात्कारासह पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पाथर्डी पोलीस करत आहेत.



