
Burglars target locked house : नगर : कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या निधनानंतर अंत्यविधीसाठी नाशिकला गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर चोरट्यांनी डल्ला (Burglars target locked house) मारत ३ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व पूजेचे साहित्य चोरून नेल्याची घटना आगरकर मळा, मोरचुदनगर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा (Burglary) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरातील व्यक्ती अंत्यविधीसाठी बाहेरगीवी गेलले
याबाबत कल्याणी टिक्कल (वय ३७, रा. गायके मळा, मोरचुदनगर, आगरकर मळ्याच्या पाठीमागे, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्या पती मंगेश टिक्कल व दोन मुलींसह वास्तव्यास असून पती-पत्नी दोघेही खासगी नोकरी करतात. फिर्यादीनुसार, कल्याणी टिक्कल यांचे सासरे भाऊसाहेब रंगनाथ टिक्कल हे काही महिन्यांपासून आजारी असल्याने ते त्यांच्या घरी राहत होते. उपचार सुरू असताना २६ जुलै रोजी मध्यरात्री खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांचा अंत्यविधी नाशिक येथे करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे २६ जुलै रोजी सकाळी घराला कुलूप लावून सर्वजण नाशिकला गेले होते.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
दरवाजे उघडे असल्याची शेजीऱ्यांनी दिली माहिती (Burglars target locked house)
दरम्यान, ६ ऑगस्ट रोजी सकाळी शेजारी संतोष राजभोग यांनी मंगेश टिक्कल यांना फोन करून घराचे पुढील व मागील दरवाजे उघडे असल्याची माहिती दिली. त्यानंतर टिक्कल कुटुंब तातडीने नाशिकहून अहिल्यानगरला परतले. घरी आल्यानंतर मुख्य दरवाजा उघडा असल्याचे तसेच घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. कपाटातील लॉकर तपासला असता त्यामधील सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.
चोरीस गेलेल्या ऐवजात अंदाजे ५० ग्रॅम वजनाचे सुमारे २ लाख ५० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असून त्यामध्ये कानातील टॉप्स, बाळी, अंगठ्या, रिंगा, ओम, नथ, वाटीमणी आदींचा समावेश आहे. तसेच ५० हजार रुपये किमतीच्या सुमारे ५०० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या वस्तू, त्यामध्ये पैंजण, देवांच्या मूर्ती व पूजेसाठी वापरातील चांदीची भांडी चोरीस गेली आहेत. एकूण चोरीचा ऐवज ३ लाख रुपये इतका असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.


