LCB : जामखेडमध्ये गोवंशीय जनावरांच्या कत्तलीचा डाव उधळला; तीन जनावरांची सुटका

LCB : जामखेडमध्ये गोवंशीय जनावरांच्या कत्तलीचा डाव उधळला; तीन जनावरांची सुटका

0
LCB : जामखेडमध्ये गोवंशीय जनावरांच्या कत्तलीचा डाव उधळला; तीन जनावरांची सुटका
LCB : जामखेडमध्ये गोवंशीय जनावरांच्या कत्तलीचा डाव उधळला; तीन जनावरांची सुटका

LCB : नगर : कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या तीन गोवंशीय जनावरांची (Bovine animals) स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने सुटका केली. या कारवाईत सकलेन कदीर कुरेशी (वय २४, रा. कुरेशी मोहल्ला, जामखेड) याला पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन गायी आणि एका वासरासह एकूण ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई

अहिल्यानगर जिल्ह्यात गोवंशीय जनावरांची कत्तल तसेच कत्तलीच्या उद्देशाने त्यांची वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

कुरेशी मोहल्ला परिसरात कारवाई (LCB)

दरम्यान, शुक्रवारी (ता. ७) स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जामखेड पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांबाबत माहिती घेत असताना गोपनीय माहिती मिळाली. कुरेशी मोहल्ला परिसरातील मोहंमदीया मस्जिदजवळील पत्र्याच्या शेडमध्ये सकलेन कदीर कुरेशी याने गोवंशीय जनावरे कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली.


मिळालेल्या माहितीची पंचांसमक्ष खात्री करून पोलिसांनी संबंधित शेडवर छापा टाकला. यावेळी शेडमध्ये एक इसम आणि तीन गोवंशीय जनावरे आढळून आली. पोलिसांनी सकलेन कदीर कुरेशी याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने ही जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवल्याचे सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या कारवाईत ६० हजार रुपये किमतीच्या दोन गायी आणि २० हजार रुपये किमतीचे एक वासरू, असा एकूण ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


याप्रकरणी सकलेन कदीर कुरेशी याच्याविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोउपनि. कृष्णकुमार सेदवाड, पोलीस अंमलदार अतुल लोटके, निळकंठ कारखिले, रोहित मिसाळ, प्रताप देवकाते, बाळासाहेब गुंजाळ आणि महिला पोलीस अंमलदार किरण ठुबे यांच्या पथकाने केली.