Supriya Sule : शरद पवारांचे ८ खासदार पंतप्रधान मोदींची ‘या’ दिवशी घेणार भेट ; सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण

0
Supriya Sule : शरद पवारांचे ८ खासदार पंतप्रधान मोदींची 'या' दिवशी घेणार भेट ; सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
Supriya Sule : शरद पवारांचे ८ खासदार पंतप्रधान मोदींची 'या' दिवशी घेणार भेट ; सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण

नगर : देशात सध्या पंतप्रधान नरेंद्र मोंदींची भेट (Prime Minister Narendra Modi’s visit) घेण्यासाठी सर्वपक्षीयांची चढाओढ सुरु झाली आहे. त्यातच आज राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सुप्रिया सुळे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. सोमवारी (ता.९) सकाळी अकरा वाजता सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ८ खासदार (8 Members of Parliament) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.

नक्की वाचा : ११ ऑगस्टपासून दुधाच्या दरात वाढ! १ लिटरसाठी किती रुपये मोजावे लागणार?

राष्ट्रवादीचे खासदार पंतप्रधानांना का भेटणार? (Supriya Sule)

सध्या महाराष्ट्रात पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, विकासाच्या चौकटीतले अनेक प्रश्न आमच्या खासदारांचे आहेत. याबाबत चर्चा करण्यासाठी आमच्या पक्षाचे ८ खासदार मोदी यांना भेटणार आहोत. सोमवारी सकाळी ११ वाजता ही भेट होणार आहे, अशी माहिती यावेळी सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. एफसीआरए बिलाला आमच्या पक्षाचा विरोध असल्याचं देखील या पत्रकार परिषदेमध्ये सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

अवश्य वाचा : दीपिका पदुकोणची ‘मीनम्मा’ आठवतेय? चित्रपटाची जान बनलेले ५ भन्नाट अन् आयकॉनिक संवाद!

‘एफसीआरए बिल आमच्यावर लादू नका’ (Supriya Sule)

सुळे पुढे म्हणाल्या की, भारत सरकारला विनंती आहे, घाई करू नका. सरकारने चर्चा केली पाहिजे. चर्चा ही लोकशाही मार्गाने व्हायला हवी. एफसीआरए बिल आमच्यावर लादू नका, चर्चा करून योग्य मार्ग काढला पाहिजे. आमचे म्हणणे आहे की, काही चुकीचे पैसे असतील, ड्रग्सचे पैसे असू शकतात किंवा काही असेल तर विरोध करा.पण काही लोक जर मदत करणार असेल तर काय समस्या आहे? सगळ्याकडे वाईट नजरेने का बघावे? आम्ही जॉइंट चर्चा करायला तयार आहोत,असंही यावेळी सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

सुप्रिया सुळेंनी यावेळी बोलताना त्यांनी डिलिमिटेशन बिलावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. डिलिमिटेशनचं बिल अजून आलंच नाहीये, आमची रोज सकाळी इडिंया अलायन्सची बैठक पार पडते, चर्चा करूनच आम्ही भूमिका घेतो, असं त्या म्हणाल्यात. तसेच शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून देखील त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नियम केले, मात्र लाडकी बहीण योजनेसाठी नाही, सरकारने असंवेदनशीलपणा दाखवला आहे, हे फक्त निवडणुकीसाठी आहे,असं यावेळी सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.