Death of a Contract Worker | नगर : अहिल्यानगर ( Ahilyanagar ) शहरातील मुकुंदनगर परिसरात दर्गा दायरा कब्रस्तानाजवळ कंत्राटी पालिका कर्मचारी ( Death of a Contract Worker ) धीरज परदेशी यांच्यावर १० ते १५ जणांनी हल्ला केला होता. त्यानंतर त्यास उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने जाहीर केले आहे. त्याची तीन दिवस मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर संपली आहे.
हे वाचा – शरद पवारांचे ८ खासदार पंतप्रधान मोदींची ‘या’ दिवशी घेणार भेट ; सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
जीवघेणा हल्ला हा पूर्वनियोजित कट ( Death of a Contract Worker )
अहिल्यानगर महापालिकेच्या ठेकेदार संस्थेच्या कर्मचाऱ्यावर मुकुंदनगर येथे शुक्रवारी (दि. ७) सायंकाळी झालेला जीवघेणा हल्ला हा पूर्वनियोजित कट असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी महापालिकेत वायरमन पदावर कार्यरत असलेल्या युनूस शेख याला शनिवारी सकाळी अटक करण्यात आली आहे. जखमी धीरज कचरुसिंग रजपूत-परदेशी (रा. भिंगार, अहिल्यानगर ) याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज (ता. ९) दुपारी त्यांना मृत घोषित करण्यात आले.
नक्की वाचा : ११ ऑगस्टपासून दुधाच्या दरात वाढ! १ लिटरसाठी किती रुपये मोजावे लागणार?

ई-स्मार्ट कंपनीची नेमणूक ( Death of a Contract Worker )
मनपाच्या विद्युत विभागाने पथदिवे दुरुस्तीसाठी ई-स्मार्ट कंपनीची नेमणूक केली आहे. धीरज रजपूत या कंपनीत हेल्पर म्हणून काम करतो. फिर्यादी अक्षय कैलास मुळे यांच्या तक्रारीनुसार, पथदिवे दुरुस्तीचे काम करणाऱ्या संस्थेला मुकुंदनगर येथे पथदिवे दुरुस्तीसाठी पाठवले होते. अक्षय मुळे, काव्य गणेश तावरे आणि धीरज रजपूत असे तिघे तेथे गेले होते. मुळे आणि तावरे हे दोघे पथदिवे दुरुस्त करण्यासाठी इमारतीवर गेले होते, तर धीरज खाली थांबला होता. त्यावेळी तेथे ६ ते ७ जण आले आणि त्यांनी लोखंडी दांडक्याने धीरजवर जीवघेणा हल्ला चढवला. मुळे आणि तावरे बचावासाठी पुढे आले, त्यांनी हस्तक्षेप केल्याने आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
या प्रकरणातील सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे, अटक करण्यात आलेला संशयित आरोपी युनूस शेख हा स्वतः महापालिकेत वायरमन पदावर कार्यरत आहे. त्याने फोन करून अक्षय मुळे यांना मुकुंदनगर येथे पथदिवे दुरुस्त करण्याबाबत कळविले होते. म्हणजेच जाणीवपूर्वक फोन करून बोलावून घेऊन हल्ला घडवून आणल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी मेहराज अस्लम सय्यद, सिराज अस्लम सय्यद, मुस्ताकिम अस्लम सय्यद व इतर तीन अनोळखींविरोधात अक्षय मुळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



