Book Publish : ‘दोन शब्द’चे आगळेवेगळे प्रकाशन; विद्यार्थ्यांच्या हस्ते गुरूच्या पुस्तकाचे लोकार्पण

0
Book Publish : ‘दोन शब्द’चे आगळेवेगळे प्रकाशन; विद्यार्थ्यांच्या हस्ते गुरूच्या पुस्तकाचे लोकार्पण
Book Publish : ‘दोन शब्द’चे आगळेवेगळे प्रकाशन; विद्यार्थ्यांच्या हस्ते गुरूच्या पुस्तकाचे लोकार्पण

Book Publish : नगर : एपिग्राम प्रकाशन, मुंबईच्या माध्यमातून डॉ. स्मिता देशपांडे भुसे यांच्या ‘दोन शब्द’ या ललित लेखसंग्रहाचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने प्रकाशन करण्यात आले. स्वतःच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी नामवंत व्यक्तींना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्याऐवजी आपल्या विद्यार्थ्यांनाच प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करून त्यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्याचा अनोखा उपक्रम डॉ. भुसे यांनी केला. त्यामुळे हा प्रकाशन सोहळा केवळ पुस्तक प्रकाशन न राहता शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील जिव्हाळ्याच्या नात्याचा आणि ऋणानुबंधाचा सुंदर सोहळा ठरला.

हेही पहा : रस्त्यात खड्डे की खड्डयात रास्ता; शाळकरी मुलींचा व्हिडीओ व्हायरल

मराठी विषयावरील प्रेम हेच वरदान

डॉ. स्मिता देशपांडे भुसे या हिंद सेवा मंडळाच्या पेमराज सारडा महाविद्यालयात मराठी विषयाचे अध्यापन करतात. अध्यापनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी केवळ शैक्षणिक नाते न ठेवता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी, भावविश्वाशी आणि जीवनप्रवासाशी जोडले जाणारे शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. विद्यार्थ्यांप्रती असलेला हा जिव्हाळा त्यांच्या लेखनातूनही सातत्याने व्यक्त होत असतो. फेसबुक या आभासी व्यासपीठावर त्या ‘समाधानाची फुले’ या लेखमालिकेतून आपल्या विद्यार्थ्यांविषयी लिहित आहेत. याच भावनेतून ‘दोन शब्द’ या ललित लेखसंग्रहाच्या प्रकाशनाचा निर्णयही त्यांनी घेतला. या प्रसंगी बोलताना डॉ. स्मिता देशपांडे भुसे म्हणाल्या, “माझे विद्यार्थी हेच माझे संजीवन आहेत. आयुष्यात जेव्हा जेव्हा आता नोकरीमधून निवृत्त व्हावे असे वाटले, तेव्हा जून महिन्यात नव्याने आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यामधील मराठी विषयावरील प्रेम हेच माझ्यासाठी वरदान ठरले आहे. म्हणून आज माझ्या पुस्तकाचे प्रकाशन माझ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात मला विशेष आनंद होत आहे.”

नक्की वाचा : अखेर जखमी महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू; तीन दिवस मृत्यूशी सुरु असलेली झुंज संपली

यांची उपस्थिती (Book Publish)

यावेळी मानसोपचारतज्ज्ञ सुकन्या फणसाळकर, आर.जे. प्रसन्न पाठक, बालनाट्यभूमीतील रंगकर्मी तेजा पाठक, जिओ स्टारचे असिस्टंट मॅनेजर विराज मुनोत, प्रसिद्ध उद्योगपती अमित गरुड, राज ऑप्टिकलचे किरण महाजन, सिद्धार्थ एंटरप्राईजेसचे संकेत होशींग, शासकीय अधिकारी अजिंक्य सोनवणे, अभिनेता तेजस अतितकर, प्रा. ऋतुजा कुलकर्णी, तेजस पवार, प्रा. अतुल कुलकर्णी, प्रा. अर्चना कुलकर्णी, प्रा. अपर्णा शेपाळ, प्रा. जयश्री पवार, डॉ. रत्ना वाघमारे, डॉ. दया भोर जेठे, डॉ. सुरेखा साळवे यांच्यासह साहित्यप्रेमी, शिक्षक, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.