Ramdas Athvale : नगर : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा शिर्डी लोकसभा मतदारसंघात पूर्वी एकदा पराभव झाला होता. या परावाचे शल्य त्यांच्या मनात अजूनही आहे. त्यामुळे ते जेव्हा जेव्हा अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येतात, त्यावेळी या मतदारसंघाव ते भाष्य करतात. ते रविवारी (ता. १०) नगरला आले असता त्यांनी या मतदासंघासंबंधी मोठा दावा केला आहे. नुकत्याच येऊ घातलेल्या मतदारसंघ फेररचनेच शिर्डी मतदारसंघाचे आरक्षण उठू शकते आणि ते अहिल्यानगर मतदारसंघावर पडू शकते, असा अंदाज आठवले यांनी केला आहे. त्यामुळे आता या अनुषंगाने चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा : धीरज परदेशी यांचा प्राणघातक हल्ल्यात मृत्यू; महापालिका कर्मचारी युनियनचा बेमुदत संपाचा इशारा
आठवलेंच्या विधानाने खळबळ
अहिल्यानगरमधील आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड यांच्या निधनानंतर आठवले यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी परिसीमन, महिला आरक्षण आणि आरक्षणातील उपवर्गीकरण या महत्त्वाच्या विषयांवर पक्षाची भूमिका मांडली. संसदेत महिला आरक्षण आणि परिसीमनाचा मुद्दा कधी आणि कसा मांडला जातो, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असतानाच आठवलेंच्या या दाव्याने स्थानिक पातळीवर मोठी खळबळ उडवून दिली आहे. मात्र, मतदारसंघांची खरी आणि अंतिम रचना अधिकृत प्रशासकीय प्रक्रियेनंतरच समोर येईल.
नक्की पहा : धीरजचा मृतदेह पोलीस अधीक्षक कार्यालयात ठेवणार; आमदार संग्राम जगतापांनी दिला इशारा
जागा रिक्त राहण्याचा धोका (Ramdas Athvale)
मातंग व इतर वंचित घटकांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याने त्यांना आरक्षणाचा पुरेसा लाभ मिळत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. “भविष्यात उपवर्गीकरण करून विशिष्ट जागा राखीव ठेवल्या आणि त्या पदांसाठी पात्र उमेदवारच मिळाले नाहीत, तर त्या जागा रिक्त राहतील. यामुळे समाजाचे मोठे नुकसान होऊ शकते,” अशी भीती त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे केवळ आरक्षणावर अवलंबून न राहता शैक्षणिक विस्तार आणि सामाजिक विकासावर भर देणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. आरक्षणाचे उपवर्गीकरण करताना मातंग समाजावर अन्याय होणार नाही आणि बौद्ध समाजाचे हक्क हिरावले जाणार नाहीत, असा समतोल साधला पाहिजे, अशी ठाम भूमिका आठवले यांनी शेवटी मांडली.



