Ahilyanagar Municipal Corporation Employees’ Union | धीरज परदेशी यांचा प्राणघातक हल्ल्यात मृत्यू; महापालिका कर्मचारी युनियनचा बेमुदत संपाचा इशारा

0
Ahilyanagar Municipal Corporation Employees' Union
Ahilyanagar Municipal Corporation Employees' Union

Ahilyanagar Municipal Corporation Employees’ Union | नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) महापालिकेच्या विद्युत विभागातील कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर तीन दिवसांपूर्वी मुकुंदनगर परिसरात प्राणघातक हल्ला झाला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या धीरज परदेशी यांचा उपचारादरम्यान आज दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने महापालिका कर्मचारी वर्गामध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली असून, अहिल्यानगर महापालिका कामगार युनियनच्या ( Ahilyanagar Municipal Corporation Employees’ Union ) वतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.

हे वाचा – अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले तालुक्यात हादरे; सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

नागरी सुविधा पुरविण्यासाठी जाणार नाही ( Ahilyanagar Municipal Corporation Employees’ Union )

कामगार युनियनतर्फे स्व. धीरज परदेशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच जोपर्यंत मनपा प्रशासनाकडून मुकुंदनगर परिसरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संपूर्ण संरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणताही कर्मचारी या परिसरात नागरी सुविधा पुरविण्यासाठी जाणार नाही, अशी भूमिका युनियनने घेतली आहे. युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले की, उद्यापासून महापालिका कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप पुकारण्यात येणार असून, संपूर्ण शहरातील नागरी सुविधा बंद ठेवण्यात येतील. यामध्ये नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल अहिल्यानगर शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

नक्की वाचा : अखेर जखमी महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू; तीन दिवस मृत्यूशी सुरु असलेली झुंज संपली

आरोपी अद्याप पसार ( Ahilyanagar Municipal Corporation Employees’ Union )

कामगार युनियनच्या म्हणण्यानुसार, धीरज परदेशी यांच्यावर सात ते आठ जणांनी हल्ला केला होता. या प्रकरणात पोलीस प्रशासनाने अद्याप चार आरोपींना अटक केली असून, उर्वरित तीन ते चार आरोपी अद्याप पसार आहेत. जोपर्यंत या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत महापालिकेचे सर्व कामकाज बंद ठेवण्यात येईल, अशी घोषणा युनियनच्या वतीने करण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असून, महापालिका कर्मचारी जीव धोक्यात घालून शहरातील नागरिकांना विविध नागरी सुविधा पुरविण्याचे काम करतात. मात्र कामाच्या ठिकाणीच कर्मचाऱ्यांवर जीवघेणे हल्ले होत असतील, तर कर्मचाऱ्यांनी सेवा कशा द्यायच्या, असा सवाल कामगार संघटनेने उपस्थित केला आहे. दरम्यान, स्व. धीरज परदेशी यांच्या अंत्यविधीची वेळ निश्चित झाल्यानंतर महापालिका कर्मचारी बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही कामगार युनियनच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here