Nikhil Ware | ५० हजारांच्या वस्तीमध्ये जखमी तरुणासाठी मदतीचा हातही पुढे आला नाही; निखिल वारे यांचा संताप

0

Nikhil Ware | नगर : मुकुंदनगर परिसरात तरुणावर हल्ला करून त्याचा खून झाल्याच्या घटनेने शहर हादरले आहे. या घटनेच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी नगरसेवक निखिल वारे ( Nikhil Ware ) यांनी घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त करत समाजातील माणुसकीच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

हे वाचा – अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले तालुक्यात हादरे; सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

एकाचीही मानसिकता झाली नाही ( Nikhil Ware )

५० हजार लोकांची वस्ती आहे; मात्र जखमी अवस्थेतील तरुणाला दवाखान्यात नेण्यासाठी एकाचीही मानसिकता झाली नाही. ही प्रवृत्ती अत्यंत वाईट आहे, असे वारे म्हणाले. यावेळी आमदार संग्राम जगताप, अक्षय कर्डिले, भाजपचे अनिल मोहिते, आदींसह नगरसेवक कार्यकर्ते, सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नक्की वाचा : अखेर जखमी महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू; तीन दिवस मृत्यूशी सुरु असलेली झुंज संपली

प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत ( Nikhil Ware )

दरम्यान, मृत तरुणाच्या पत्नीने केलेल्या मागण्या रास्त आहेत. तिच्यावर अन्याय होऊ नये आणि तिला योग्य तो न्याय मिळावा, यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी वारे यांनी केली. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याबरोबरच अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here