Radhakrishna Vikhe Patil | बाजारपेठेत नागरिकांवर पुन्हा हल्ला झाल्यास पोलिसांवरच कारवाई; पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचा इशारा

0

Radhakrishna Vikhe Patil | नगर : आपल्या बोटचेपी धोरणामुळे त्यांचे धाडस वाढत असल्याने बाजारपेठेत महिला व नागरिकांवर सतत हल्ले होत आहेत. यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही. बाजारपेठेतील गुंडगिरी आणि दहशतीला आता थारा दिला जाणार नाही. बाजारपेठेत नागरिकांवर पुन्हा एकदा हल्ला झाल्याची तक्रार अत्यास संबंधित पोलिसांवरच कारवाई करू, असा स्पष्ट इशारा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी दिला. 

हे वाचा – अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले तालुक्यात हादरे; सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

गुंडगिरी १०० टक्के मोडून काढण्याचा संकल्प ( Radhakrishna Vikhe Patil )

ते पुढे म्हणाले, आमदार संग्राम जगताप यांनी व्यापाऱ्यांच्या मागे ठाम उभे राहून अतिक्रमण, दहशत मुक्त बाजारपेठ व अहिल्यानगर शहर करण्याचा संकल्प केला; त्याबद्दल त्यांचे अभिनंदन! बाजारपेठेतील गुंडगिरी आणि दहशतीला स्थानिकांनीही प्रतिकार केला पाहिजे. प्रत्येक वेळी आमदार किंवा मंत्री मदतीला धावून येतील, अशी अपेक्षा ठेवू नका. बाजारपेठ अधिक समृद्ध व्हावी, व्यापार वाढावा यासाठी सुरक्षित वातावरण आवश्यक आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात बाजारपेठेतील दहशत आणि गुंडगिरी १०० टक्के मोडून काढण्याचा संकल्प आमदार संग्राम जगताप व मी केला आहे.

नक्की वाचा : अखेर जखमी महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू; तीन दिवस मृत्यूशी सुरु असलेली झुंज संपली

रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन ( Radhakrishna Vikhe Patil )

आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या निधीतून होणाऱ्या कापड बाजारातील भिंगारवाला चौक ते सर्जेपुरा चौक पर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते रविवारी झाले. यावेळी आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, स्थायी समितीचे सभापती सुभाष लोंढे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर व भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्यासह महायुतीचे नगरसेवक, पदाधिकारी, व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री विखे पुढे म्हणाले, बऱ्याच वर्षांपासून आहे त्याच स्थितीत असलेला कापडबाजारचा परिसर विकासासाठी आसुसलेला होता. मात्र आता प्रतिक्षा संपली आहे. स्वयंघोषितांनी येथे गुंडगिरीने अतिक्रमण करून बाजारपेठ विद्रूप केली. यामध्ये व्यापारी भरडला गेला व त्यांचे नुकसानही झाले. पण आ.संग्राम जगताप यांनी त्यांची दहशत मोडीत काढली आहे. या बाजारपेठेला पूर्णवैभव प्राप्त करण्यासाठी अजून बरेच महत्वाचे निर्णय आम्ही घेणार आहोत. त्यामुळे शहराच्या वैभवात भर घालणारी ही बाजारपेठ ठरणार आहे.

हेही पहा : रस्त्यात खड्डे की खड्डयात रास्ता; शाळकरी मुलींचा व्हिडीओ व्हायरल

आमदार संग्राम जगताप म्हणाले, ही बाजारपेठ नगरचा प्रमुख भाग व मिरवणूक मार्ग आहे. राज्यात नावाजलेल्या या बाजारपेठेत ग्राहकांना अतिक्रमणाच्या अडचणींना सामारे जावे लागत असे. आता जीहाद्यांची दहशत व गुंडगिरी मोडीत काढून ही बाजारपेठ अतिक्रमण मुक्त करणार आहे. यासाठीच मी ठाण मांडून येथे बसणार आहे. व्यापाऱ्यांनी फक्त साथ द्यावी. परत त्यांची अतिक्रमणे करण्याची, आपल्या मायमाऊलिंवर हात टाकण्याची हिंमत होणार नाही, असा बंदोबस्त मी त्यांचा करत आहे. शहर विकासाचाच माझा अजेंडा आहे त्यामुळे शहराचा विकास थांबणार नाहीये. त्याचबरोबरच आपल्या हिंदू धर्माचे रक्षण करत त्याची कास पुढे नेण्यास माझे प्राधान्य आहे. पालकमंत्र्यांच्या सहकार्यामुळे हा विकासाचा रथ पढे नेत उद्योग व रोजगार वाढवायचा आहे. राज्यातील महायुतीच्या सरकारकडे सतत पाठपुरावा केल्याने शहरातील गल्लीबोळातील व प्रमुख रस्त्यांसाठी निधी आपल्या पदरात पडला आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ईश्वर बोरा यांनी केले. यावेळी माजी सभापती किशोर डागवाले, नगरसेविका उषा डागवाले, सुवर्णा गेनाप्पा, निखील वारे, बाळासाहेब पवार, बाबासाहेब वाकळे, सुवर्णा गेनाप्पा, निखील वारे, बाळासाहेब पवार, गणेश कवडे, ऋग्वेद गंधे, अनिल बोरुडे, मनोज दुल्लम, महेश लोंढे, जालिंदरजी कोतकर यांच्यासह नगरसेवक, प्रतिष्ठित व्यापारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here