Horrific Accident : कंटेनरच्या धडकेने घडला भीषण अपघात; उद्योजकासह अभियंत्याचा मृत्यू

Horrific Accident : कंटेनरच्या धडकेने घडला भीषण अपघात; उद्योजकासह अभियंत्याचा मृत्यू

0
Horrific Accident : कंटेनरच्या धडकेने घडला भीषण अपघात; उद्योजकासह अभियंत्याचा मृत्यू
Horrific Accident : कंटेनरच्या धडकेने घडला भीषण अपघात; उद्योजकासह अभियंत्याचा मृत्यू

Horrific Accident : पारनेर : पुणे–अहिल्यानगर महामार्गावर शिरूर बायपासजवळ मंगळवारी (दि. ११ ऑगस्ट) सायंकाळी कंटेनर, कार, दुचाकी आणि बस अशा चार वाहनांचा भीषण अपघात (Horrific Accident) झाला. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये वाडेगव्हाण येथील उद्योजक किशोर यादव यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

चार वाहनांची अचानक धडक

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शिरूर बायपासजवळ हॉटेल संग्राम समोर महामार्गावर चार वाहनांची अचानक धडक झाली. कंटेनर, फोर्ड एन्डेव्हर कार, दुचाकी आणि बस या वाहनांचा अपघातात समावेश होता. धडक इतकी जोरदार होती की वाहनांचे मोठे नुकसान झाले.ज्यात आधी कंटेनर ने फोर्ड एन्डेव्हर कार ला मागून धडक दिली फोर्ड एन्डेव्हर कार ने पुढे उभ्या असलेल्या मोटारसायकल ला धडक दिली व कंटेनर ने मागून दिलेली धडक इतकी जोरदार होती की मोटारसायकल व फोर्ड एन्डेव्हर कार दोन्हीही दुसऱ्या बाजूने समोरून येणाऱ्या बस ला धडकून हे दुर्दैवी घटना घडली हे या अपघाताचा थरकाप उडवणारा १८ सेकंदांचा व्हिडिओ समोर आला असून, अपघाताची तीव्रता त्यातून स्पष्ट होत आहे. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

प्रसिद्ध उद्योजक किशोर यादव यांचा समावेश (Horrific Accident)

फोर्ड एन्डेव्हर कारचे चालक आणि दुचाकीस्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये वाडेगव्हाण (ता. पारनेर) येथील प्रसिद्ध उद्योजक किशोर यादव यांचा समावेश आहे.

अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थितीचा आढावा घेत पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू केली तसेच अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

दरम्यान, अपघातानंतर कंटेनर चालक कंटेनरसह घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती आहे. त्यामुळे अपघात नेमका कशामुळे झाला, कंटेनरची भूमिका काय होती आणि चालक कोण होता, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.

शिरूर परिसरातून पुणे–अहिल्यानगर मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे या मार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यापूर्वीही शिरूर परिसरात कंटेनर आणि कारच्या भीषण धडकेत जीवितहानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.