Rohit Pawar : कर्जतमध्ये उद्या आमदार रोहित पवार यांचा सन्मान

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लाभ

0
Rohit Pawar : कर्जतमध्ये उद्या आमदार रोहित पवार यांचा सन्मान
Rohit Pawar : कर्जतमध्ये उद्या आमदार रोहित पवार यांचा सन्मान

Rohit Pawar : कर्जत : शेतकरी (Farmers) आणि युवकांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत राज्य आणि केंद्र सरकार (Central Government) विरोधात आंदोलनाची धार तीव्र करीत त्याचे फलित देणारे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचा गुरुवारी (ता.१३) कर्जतमध्ये सन्मान होणार असून सर्वसामान्य शेतकरी आणि नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन रघु काळदाते यांनी केले.

नक्की वाचा : मढीत अमावस्येच्या गर्दीत महिला चोरट्यांचा धुमाकूळ; नऊ संशयित महिला पोलिसांच्या ताब्यात

शेतकरी संघटनांच्या वतीने हा सत्कार आयोजित

कर्जतच्या शिवपार्वती मंगल कार्यालयात दुपारी एक वाजता कर्जमाफी आणि कांदा प्रश्नावरील आंदोलनाच्या यशाबद्दल शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आय, शिवसेना (उबाठा) तसेच कर्जत तालुक्यातील विविध शेतकरी संघटनांच्या वतीने हा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. आमदार रोहित पवार यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कर्जमाफी प्रश्नांवर जाचक अटी रद्द करीत सरसकट २ लाखापर्यंतची कर्जमाफी मिळवून देण्यात राज्य सरकारला धारेवर धरत आक्रमक भूमिका घेतली होती.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लाभ (Rohit Pawar)

यासह राज्यातील कांदा प्रश्नावर देखील ते आक्रमक झाले होते. ४०० ते ५०० दर त्यांच्या आंदोलनाने अडीच हजारापर्यंत गेला. याचा लाभ कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात झाला. याच अनुषंगाने आमदार रोहित पवार यांचा सन्मान सोहळा कर्जतमध्ये होणार असल्याची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली.