ISRO : इस्रोच्या श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रास विद्यार्थ्यांची प्रेरणादायी भेट

‘केअर फॉर यू’ फाउंडेशनच्या 43 विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव

0
ISRO : इस्रोच्या श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रास विद्यार्थ्यांची प्रेरणादायी भेट
ISRO : इस्रोच्या श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रास विद्यार्थ्यांची प्रेरणादायी भेट

ISRO : नगर : ‘केअर फॉर यू’ फाउंडेशनच्या (‘Care For You’ Foundation) वतीने 10 ऑगस्ट 2026 रोजी श्रीहरीकोटा येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) येथे शैक्षणिक भेटीचे आयोजन करण्यात आले. या भेटीत महाराष्ट्रातील विविध बालसंगोपन संस्थांमधील 43 विद्यार्थी आणि 30 स्वयंसेवक (Volunteer) सहभागी झाले. भारताच्या अंतराळ संशोधनातील प्रगतीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची ही विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय संधी ठरली.

नक्की वाचा : कर्जतमध्ये उद्या आमदार रोहित पवार यांचा सन्मान

ISRO : इस्रोच्या श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रास विद्यार्थ्यांची प्रेरणादायी भेट
ISRO : इस्रोच्या श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रास विद्यार्थ्यांची प्रेरणादायी भेट

विद्यार्थ्यांना ज्ञान, संवाद आणि प्रेरणेची अनोखी अनुभूती

या पथकासोबत ‘केअर फॉर यू’ फाउंडेशनचे मुख्य सल्लागार तथा महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व विशेष पथके) कृष्ण प्रकाश राजमोहन प्रसाद, IPS यांच्या विशेष उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांना मोठी प्रेरणा मिळाली. यावेळी सीए प्रसाद भंडारी, ॲडव्होकेट कौवल्य कुलकर्णी, सिद्धार्थ गोंगडे, स्मिता सारडा आणि मधुसूदन सारडा आदी मान्यवर उपस्थित होते. या संपूर्ण भेटीत विद्यार्थ्यांना ज्ञान, संवाद आणि प्रेरणेची अनोखी अनुभूती मिळाली. इस्रोमधील वरिष्ठ अधिकारी व शास्त्रज्ञांशी संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. भारताच्या अंतराळ मोहिमांमागील मेहनत, अचूकता, शिस्त आणि समर्पण याची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

ISRO : इस्रोच्या श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रास विद्यार्थ्यांची प्रेरणादायी भेट
ISRO : इस्रोच्या श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रास विद्यार्थ्यांची प्रेरणादायी भेट

अत्याधुनिक सुविधांची प्रत्यक्ष माहिती (ISRO)

या भेटीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे इस्रोचे अध्यक्ष श्री. व्ही. नारायणन यांच्याशी बंगळूर येथून झालेला ऑनलाइन व्हिडिओ संवाद. आपल्या अत्यंत व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांचा हा संवाद विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आणि अविस्मरणीय ठरला.इस्रोतर्फे करण्यात आलेल्या सर्व व्यवस्थाही अत्यंत प्रशंसनीय होत्या. बस वाहतूक, निवास, भोजन आणि इतर आवश्यक सुविधांची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना श्रीहरीकोटा येथील पहिले व दुसरे प्रक्षेपण केंद्र तसेच नियंत्रण कक्षाला भेट देण्याची संधी मिळाली. भारताच्या ऐतिहासिक अंतराळ मोहिमा ज्या ठिकाणाहून पार पडतात, त्या अत्याधुनिक सुविधांची प्रत्यक्ष माहिती मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात मोठी भर पडली.

ISRO : इस्रोच्या श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रास विद्यार्थ्यांची प्रेरणादायी भेट
ISRO : इस्रोच्या श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रास विद्यार्थ्यांची प्रेरणादायी भेट

शास्त्रज्ञांना भेटून त्यांचा सत्कार

या भेटीतील विशेष उल्लेखनीय भाग म्हणजे श्री. एन. कुमार, ग्रंथालय अधिकारी-ड, एलआयआरडी/एमएसए, एसडीएससी-शार, इस्रो, श्रीहरीकोटा यांच्याशी झालेला सविस्तर संवाद. त्यांनी अत्यंत शांतपणे आणि सोप्या भाषेत अंतराळ विज्ञानातील अनेक बारकावे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले तसेच त्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. त्यांच्या संवादामुळे अंतराळ विज्ञानासारखा जटिल विषय विद्यार्थ्यांसाठी अधिक सोपा, रंजक आणि समजण्यासारखा झाला.‘केअर फॉर यू फाउंडेशन ला इस्रोमधील अनेक मान्यवर अधिकारी आणि शास्त्रज्ञांना भेटून त्यांचा सत्कार करण्याचा मानही मिळाला. यामध्ये प्रतिष्ठित शास्त्रज्ञ व संचालक एस. मुथुचेलझियन, उपसंचालक पी. गोपी कृष्णा आणि व्ही. बास्करन यांचा समावेश होता. तसेच संचालक शुक्ला आणि इतर शास्त्रज्ञांनी विद्यार्थ्यांना हिंदी भाषेत विविध तांत्रिक बाबी अत्यंत सोप्या पद्धतीने समजावून सांगितल्या.

ISRO : इस्रोच्या श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रास विद्यार्थ्यांची प्रेरणादायी भेट
ISRO : इस्रोच्या श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रास विद्यार्थ्यांची प्रेरणादायी भेट

उपक्रमाचे इस्रोच्या शास्त्रज्ञांनी केले विशेष कौतुक

त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना अनेक तांत्रिक संकल्पना सहज समजल्या.या शैक्षणिक भेटीदरम्यान विद्यार्थ्यांच्या कलागुणांचेही सुंदर दर्शन घडले. सीए प्रसाद भंडारी यांच्या मुली रचना व रचिता यांनी स्वतःच्या हाताने सुंदर पेंटिंग साकारले होते. ही हस्तनिर्मित कलाकृती त्यांनी इस्रोमधील काही शास्त्रज्ञांना प्रेमपूर्वक भेट दिली. विद्यार्थ्यांच्या कलात्मकतेतून आणि सर्जनशीलतेतून साकारलेली ही पेंटिंग इस्रोच्या शास्त्रज्ञांविषयी असलेल्या आदराची आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करणारी ठरली. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे उपस्थित मान्यवर व इस्रोच्या शास्त्रज्ञांनी विशेष कौतुक केले. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणारा हा क्षण या शैक्षणिक भेटीतील विशेष आठवण ठरला.

ISRO : इस्रोच्या श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रास विद्यार्थ्यांची प्रेरणादायी भेट
ISRO : इस्रोच्या श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रास विद्यार्थ्यांची प्रेरणादायी भेट

या शैक्षणिक भेटीला एक वेगळेच महत्त्व प्राप्त

इस्रोमधील सर्व मान्यवरांनी दिलेला अमूल्य वेळ, मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांशी केलेला संवाद यामुळे या शैक्षणिक भेटीला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले.‘केअर फॉर यू’ फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांसाठी इस्रोची ही भेट केवळ एक शैक्षणिक सहल नव्हती, तर नवीन स्वप्ने पाहण्याची, मोठी ध्येये निश्चित करण्याची आणि ती साध्य करण्यासाठी प्रेरणा घेण्याची एक अनोखी संधी होती. या भेटीने विद्यार्थ्यांच्या मनात जिज्ञासा निर्माण केली आणि ज्ञान, मेहनत, समर्पण व चिकाटीच्या बळावर आकाशालाही गवसणी घालता येते, हा आत्मविश्वास निर्माण केला. विद्यार्थ्यांना श्रीहरीकोटा येथील इस्रोच्या या प्रेरणादायी व शैक्षणिक भेटीला घेऊन जाण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल महिला व बाल विकास विभागाचे ‘केअर फॉर यू’ फाउंडेशनतर्फे मनःपूर्वक आभार मानण्यात येत आहेत.