SIR Campaign : नगर : विशेष सखोल पुनरीक्षण मोहीमेअंतर्गत (SIR Campaign) अहिल्यानगर जिल्ह्याचे कामकाज १०० टक्के पूर्ण झाले असून त्यात शेवगाव मतदारसंघाचे देखील कामकाज पूर्ण झाले आहे. मतदान केंद्र निहाय मयत, दुबार तसेच कायम स्वरुपी स्थलांतरित मतदारांच्या (Migrant Voters) याद्या तातडीने BLA यांना उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे (Sunil Gadhe) यांनी शेवगाव मतदार संघाचा आढावा घेताना दिल्या आहेत.
नक्की वाचा : इस्रोच्या श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रास विद्यार्थ्यांची प्रेरणादायी भेट

इतिवृत्त प्रसिद्ध करण्याच्या सूचना
शेवगाव तहसील कार्यालयात 20 टक्क्यांपेक्षा अधिक असंकलित मतदार संख्या असणाऱ्या BLO यांच्या कामकाजाचा आढावा जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांच्या निर्देशानुसार उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी घेतला आहे. यावेळी उपस्थित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना मयत दुबार व कायमस्वरूपी स्थलांतरित मतदारांच्या याद्या BLA यांना देण्याबाबत व त्यांच्या सोबत यासंदर्भात बैठक घेऊन त्याचे इतिवृत्त प्रसिद्ध करण्याच्या सूचना दिल्या. 17 ऑगस्ट पर्यंत घरोघरी भेटीची मुदत असल्याने मयत दुबार स्थलांतरित यादीत चुकून नाव आले असल्यास त्याची माहिती संबंधित मतदार यांनी 16 ऑगस्ट पर्यंत स्थानिक BLO किंवा तहसील कार्यालयास दिल्यास त्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करता येणार आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

BLO यांच्या कामाची पाहणी (SIR Campaign)
जिल्हा स्तरावर देखील या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून मतदारांनी या यादीचे अवलोकन करण्याच्या देखील सूचना त्यांनी दिल्या आहेत. क्षेत्रीय स्तरावर सामानगाव ता. शेवगाव येथे उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे यांनी भेट देऊन BLO यांच्या कामाची पाहणी केली. तसेच यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित नागरिकांशी देखील याबाबत त्यांनी संवाद साधला. बैठकीच्या वेळी तहसीलदार आकाश दहाडदे, निवडणूक नायब तहसील विशाल सदनापूरकर, अभिजित राय कवाड, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, मतदानकेंद्र स्तरीय अधिकारी उपस्थित होते.



