Gavathi Katta : गावठी कट्टा विक्रीसाठी आलेले दोघे जेरबंद; चार जिवंत काडतुसे आणि मोबाईलसह १ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त

भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0
Gavathi Katta : गावठी कट्टा विक्रीसाठी आलेले दोघे जेरबंद; चार जिवंत काडतुसे आणि मोबाईलसह १ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त
Gavathi Katta : गावठी कट्टा विक्रीसाठी आलेले दोघे जेरबंद; चार जिवंत काडतुसे आणि मोबाईलसह १ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त

Gavathi Katta : नगर : गावठी कट्टा (Gavathi Katta) विक्री करण्यासाठी भिंगार नाला परिसरात आलेल्या बिहारमधील (Bihar) तरुणासह त्याच्या साथीदाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक गावठी पिस्टल, चार जिवंत काडतुसे, स्टीलची मॅगझीन आणि दोन मोबाईल असा एकूण १ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विकास कमल यादव (वय १८, रा. गंगापूर, ता. नखानूर, जि. मधुबनी, बिहार) आणि ओमकार अनिल शिंदे (वय २१, रा. भिंगार, अहिल्यानगर) यांना ताब्यात घेतले.

नक्की वाचा : असंकलित मतदारांच्या याद्या स्थानिक स्तरावर तत्काळ प्रसिद्ध कराव्यात : सुनील गाढे

कोम्बिंग ऑपरेशन राबविण्याचे आदेश

जिल्ह्यातील गंभीर गुन्हे तसेच सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी बुधवारी (ता.१२) रात्री जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक विविध भागांत गस्त घालत होते.दरम्यान, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिंगार नाला परिसरात बिहारमधील विकास कमल यादव हा गावठी कट्टा विक्री करण्यासाठी आला असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात शोध घेतला असता दोन संशयित इसम आढळून आले. पोलिसांनी पंचांसमक्ष कारवाई करत विकास कमल यादव (वय १८, रा. गंगापूर, ता. नखानूर, जि. मधुबनी, बिहार) आणि ओमकार अनिल शिंदे (वय २१, रा. भिंगार, अहिल्यानगर) यांना ताब्यात घेतले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Gavathi Katta)

दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडून ५० हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्टल, दोन हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे, सात हजार रुपये किमतीची स्टीलची मॅगझीन व त्यातील दोन काडतुसे तसेच ६० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा एकूण १ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भिंगार कॅम्प पोलिस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.