Dhiraj Pardeshi  Murder case | परदेसी खून प्रकरणात आणखी एक आरोपी अटक; चार दिवसांची पोलीस कोठडी

0

Dhiraj Pardeshi  Murder case | नगर : अहिल्यानगर महापालिकेच्या ( AMC ) विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचारी धीरज कचरूसिंग राजपूत-परदेशी यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी (  Dhiraj Pardeshi  Murder case ) दाखल गुन्ह्यात आणखी एकाचा सहभाग पोलिसांच्या तपासात समोर आला आहे. मुख्य संशयित आरोपींना मदत केल्याच्या आरोपावरून इम्रान मुसा सय्यद (रा. सिव्हील कॉलनी, मुकुंदनगर) याला भिंगार कॅम्प पोलिसांनी गुरूवारी (ता.१३) अटक केली. न्यायालयाने त्याला १७ ऑगस्टपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या घटनेप्रमाणे एकूण सात आरोपी पोलिसांनी अटक केली आहे.

हे वाचा – श्रीरामपूर तालुक्यातील १५०० एकर जमीन ‘निबे ग्रुप’ला देण्यास मंजुरी, शेती महामंडळाच्या जमिनीचा भाडेपट्टी करार

उपचारादरम्यान मृत्यू ( Dhiraj Pardeshi  Murder case )

धीरज राजपूत-परदेशी हे मुकुंदनगर परिसरातील दर्गा दायरा येथे पथदिव्यांच्या दुरूस्तीचे काम करीत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच ९ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. 

नक्की वाचा : संगमनेरच्या रेल्वेसाठी आंदोलन नव्हे, जिद्दीने पाठपुरावा करू : डॉ. सुजय विखे

पोलिसांकडून कसून चौकशी ( Dhiraj Pardeshi  Murder case )

या प्रकरणातील मुख्य संशयित मुस्तकीम ख्वाजामिया सय्यद, मेहराज इब्राहिम सय्यद आणि सिराज इब्राहिम सय्यद (तिघेही रा. आलमगीर, भिंगार) यांना पोलिसांनी हैदराबाद येथून ताब्यात घेतले होते. त्यांना पळून जाण्यास मदत केल्याच्या आरोपावरून ख्वाजामिया उर्फ अकरम याकुब सय्यद (रा. आलमगीर) आणि वसीम रहिम सय्यद (रा. फकीरवाडा, मुकुंदनगर) यांनाही नगरमधून अटक करण्यात आली. याशिवाय महापालिकेचा वायरमन युनूस खान यालाही पोलिसांनी अटक केली आहे, असे एकुण सात आरोपी अटक केले आहे. या सर्वांकडे सध्या पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

तपासादरम्यान मुख्य संशयित तिघांना इम्रान सय्यद याने मदत केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. मुख्य संशयितांना त्याने नेमकी कोणत्या स्वरूपाची मदत केली, हत्येच्या घटनेशी त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध आहे का, तसेच घटनेनंतर आरोपींना लपण्यासाठी अथवा पळून जाण्यासाठी त्याने कोणती मदत केली, याचा तपास पोलीस कोठडीत केला जाणार आहे. दरम्यान, या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही पोलिसांकडून शोध सुरू आहे. त्यामुळे तपासात आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here