Dead Body : अकोला शिवारात आढळला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह; पाथर्डी तालुक्यात खळबळ

पाथर्डी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

0
Dead Body : अकोला शिवारात आढळला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह; पाथर्डी तालुक्यात खळबळ
Dead Body : अकोला शिवारात आढळला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह; पाथर्डी तालुक्यात खळबळ

Dead Body : पाथर्डी : अकोला (Akola) (ता. पाथर्डी) गावच्या शिवारात एका पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह (Dead Body) आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृतदेहाची ओळख ऋषिकांत शिवाजी पांजरे (वय ४५, रा. वडुले बुद्रुक, ता. शेवगाव) अशी करण्यात आली आहे.

नक्की वाचा : श्रीरामपूर तालुक्यातील १५०० एकर जमीन ‘निबे ग्रुप’ला देण्यास मंजुरी, शेती महामंडळाच्या जमिनीचा भाडेपट्टी करार

पोलिसांची घटनास्थळी धाव

मृतदेह मोठ्या प्रमाणात कुजलेल्या अवस्थेत असून, अज्ञात प्राण्यांनी शरीराचा काही भाग खाल्ल्याचे दिसून आले. बुधवार (ता. १३) सकाळी साडेसहाच्या सुमारास अकोला गावच्या शिवारात एक पुरुष मृतावस्थेत पडलेला असल्याची माहिती सुधाकर रमेश गर्जे (रा. अकोला, ता. पाथर्डी) यांनी पाथर्डी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पाथर्डी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद (Dead Body)

या घटनेची पाथर्डी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद  करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक भाऊसाहेब खेडकर करीत आहेत. दरम्यान, मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत अधिकृत माहिती शवविच्छेदनानंतर आलेल्या वैद्यकीय अहवालातून स्पष्ट होणार आहे.