Shirdi : शिर्डी : श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या श्री साईबाबांच्या (Shri Saibaba) पावन भूमीत गेल्या ३२ वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या श्री साई सच्चरित पारायण सोहळ्याला यंदाही भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या पारायण सोहळ्यास भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांनी भेट देऊन साईचरित्राचे श्रवण केले आणि विखे पाटील परिवाराच्या वतीने भाविकांना शुभेच्छा दिल्या.
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी नाट्य रसिक मंच आणि शिर्डी (Shirdi) ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने या पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या ३२ वर्षांपासून सुरू असलेली ही आध्यात्मिक परंपरा शिर्डीच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचा महत्त्वाचा भाग बनली आहे. शिर्डी, पंचक्रोशी, राहाता तालुका तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने माता-भगिनी आणि साईभक्त या सोहळ्यात सहभागी झाले आहेत.
३२ वर्षे अखंडपणे सुरू असलेला पारायण सोहळा
गेली ३२ वर्षे अखंडपणे सुरू असलेला हा पारायण सोहळा श्रद्धा, सबुरी, संस्कार आणि सामाजिक एकोप्याची परंपरा जपणारा आहे. साईबाबांच्या पावन भूमीत एवढ्या मोठ्या संख्येने माता-भगिनी आणि भाविक सहभागी होत आहेत, ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. साईबाबांच्या आशीर्वादाने शिर्डी परिसरात आनंददायी, सुरक्षित आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू,असे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
विशेष कार्यक्रम आयोजित करण्याची ग्वाही (Shirdi)
विखे पाटील परिवाराच्या वतीने दरवर्षी महिलांसाठी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. मागील वर्षी शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते. यंदाही महिलांसाठी धार्मिक अथवा सांस्कृतिक स्वरूपाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्याची ग्वाही डॉ. सुजय विखे पाटील यांनी यावेळी दिली.
यावेळी विखे पाटील परिवाराच्या वतीने साईकार्यासाठी एक लाख रुपयांचे योगदान देण्यात आले. तसेच ग्रामस्थांसमवेत अल्पोपहाराचा आस्वाद घेत डॉ. विखे पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला.साईबाबांच्या कृपेने सर्वांचे जीवन सुखी, समृद्ध, निरोगी आणि आनंदमय व्हावे, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.
याप्रसंगी भाविक भक्त, माता-भगिनी, ग्रामस्थ,सर्व नगरसेवक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.



