MLA Dr. Kiran Lahamate : खानापूर शासकीय वसतिगृहाची आमदार डॉ. किरण लहामटे यांच्याकडून पाहणी

MLA Dr. Kiran Lahamate : खानापूर शासकीय वसतिगृहाची आमदार डॉ. किरण लहामटे यांच्याकडून पाहणी

0
MLA Dr. Kiran Lahamate : खानापूर शासकीय वसतिगृहाची आमदार डॉ. किरण लहामटे यांच्याकडून पाहणी
MLA Dr. Kiran Lahamate : खानापूर शासकीय वसतिगृहाची आमदार डॉ. किरण लहामटे यांच्याकडून पाहणी

अस्वच्छता, निकृष्ट भाजीपाला अन् अधीक्षक मुक्कामी राहत नसल्याचे निदर्शनास; तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना

MLA Dr. Kiran Lahamate : अकोले : तालुक्यातील खानापूर (Khanapur) येथील शासकीय वसतिगृहास (Government Hostel) आमदार डॉ. किरण लहामटे (MLA Dr. Kiran Lahamate) यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. वसतिगृहातील भोजनाचा दर्जा व स्वच्छतेबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आमदार लहामटे यांनी ही पाहणी केली.

विद्यार्थ्यांच्या दैनंदिन सुविधांबाबत दक्षतेची गरज

पाहणीदरम्यान वसतिगृह परिसरात अस्वच्छता असल्याचे तसेच विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भाजीपाल्याचा दर्जा समाधानकारक नसल्याचे निदर्शनास आले. याशिवाय वसतिगृहाचे अधीक्षक मुक्कामी राहत नसल्याची बाबही समोर आली. विद्यार्थ्यांच्या निवास, भोजन व दैनंदिन सुविधांबाबत प्रशासनाने अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

स्वच्छता व भोजनामध्ये तातडीने सुधारणेच्या सूचना (MLA Dr. Kiran Lahamate)

विद्यार्थ्यांना दर्जेदार व पौष्टिक भोजन, स्वच्छ परिसर तसेच आवश्यक त्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे वसतिगृहातील स्वच्छता, भोजनाचा दर्जा आणि व्यवस्थापनामध्ये तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना आमदार डॉ. लहामटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. दिलेल्या सूचनांनुसार तातडीने आवश्यक त्या सुधारणा करण्यात याव्यात. अन्यथा संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर पुढील प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही आमदार लहामटे यांनी यावेळी दिला.