Competitive Exam Study Centre : मजले चिंचोलीतील नागरिकांनी एकत्र येत साकारली युवकांसाठी स्पर्धा परीक्षा अभ्यासिका

Competitive Exam Study Centre : मजले चिंचोलीतील नागरिकांनी एकत्र येत साकारली युवकांसाठी स्पर्धा परीक्षा अभ्यासिका

0

स्पर्धात्मक दिवस लक्षात घेता मजले चिंचोली येथील गावकऱ्यांनी एकत्र येऊन युवकांसाठी स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्र सुरू केले.

Competitive Exam Study Centre : नगर: अहिल्यानगर तालुक्यातील मजले चिंचोली (Majle Chincholi) या गावात डॉ . बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचे (Competitive Exam Study Centre) उद्घाटन छत्रपती संभाजीनगरचे CGST चे अतिरिक्त आयुक्त राजकुमार केंद्रे (Rajkumar Kendre) यांनी केले. प्रमुख उपस्थिती म्हणून अहिल्यानगरचे निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते उपस्थित होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

दादासाहेब गिते यांनी सांगितले की,(Competitive Exam Study Centre)

दादासाहेब गिते यांनी युवकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, मुलांनी मनात जिद्द ठेवावी त्यामुळे यश नक्की मिळेल, पुस्तक वाचत नाही तोपर्यंत ज्ञान प्राप्त होणार नाही. गावातील नागरिकांनी एकत्र येऊन लोकवर्गणीतून अभ्यासिका सुरू केली. गावातील निलेश ढाकणे यांनी अभ्यासिकेसाठी फर्निचर उपलब्ध करून दिले.