Crowd of devotees : राहाता : श्रावण महिन्यातील पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त ग्रामदैवत श्री वीरभद्रेश्वर महादेव मंदिरात भगवान महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची वर्दळ सुरू झाली होती. दिवसभर परिसर ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’च्या जयघोषाने दुमदुमून गेला. भक्तिमय वातावरणात भाविकांनी महादेवाचे मनोभावे दर्शन घेत पूजा-अर्चा केली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
मंदिरात दर्शनासाठी गर्दी
श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार हा भगवान महादेवाच्या उपासनेसाठी विशेष मानला जातो. त्यामुळे पहिल्याच श्रावणी सोमवारनिमित्त सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी महिला भक्तांबरोबरच, पुरुष तसेच ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या उत्साहाने महादेवाचे दर्शन घेतले. भाविकांनी भगवान महादेवाला बेलपत्र, फुले, दूध व जल अर्पण करून अभिषेक व पूजा केली.
उपसभापती सचिन अहिर यांच्याकडून श्री क्षेत्र शनि शिंगणापूर येथे शनैश्वर महाराजांना तेलाभिषेक
भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण (Crowd of devotees)
यावेळी दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. काही भाविकांनी कुटुंबासह मंदिरात उपस्थित राहून महादेवाची आराधना केली. मंदिर परिसरात विविध धार्मिक साहित्य व पूजेचे साहित्य घेण्यासाठीही भाविकांची गर्दी झाली होती. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष जबाजी मेचे, उपाध्यक्ष विजय सदाफळ, माजी अध्यक्ष साहेबराव निधाने तसेच ट्रस्टचे सदस्य व गावकरी उपस्थित होते.



