Case registered against MLA Sangram Jagtap : चिंचोली काळदात फाट्यावर रास्ता रोको; आमदार संग्राम जगताप यांच्यासह १०० ते १५० जणांवर गुन्हा दाखल

Case registered against MLA Sangram Jagtap : चिंचोली काळदात फाट्यावर रास्ता रोको; आमदार संग्राम जगताप यांच्यासह १०० ते १५० जणांवर गुन्हा दाखल

0
Case registered against MLA Sangram Jagtap : चिंचोली काळदात फाट्यावर रास्ता रोको; आमदार संग्राम जगताप यांच्यासह १०० ते १५० जणांवर गुन्हा दाखल
Case registered against MLA Sangram Jagtap : चिंचोली काळदात फाट्यावर रास्ता रोको; आमदार संग्राम जगताप यांच्यासह १०० ते १५० जणांवर गुन्हा दाखल

Case registered against MLA Sangram Jagtap : नगर : चिंचोली काळदात येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या विटंबनेच्या निषेधार्थ सोमवारी (ता.१७) चिंचोली काळदात फाटा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे श्रीगोंदा-जामखेड राज्य महामार्गासह (Shrigonda-Jamkhed State Highway) कर्जत-मिरजगाव मार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी आमदार संग्राम जगताप यांच्यासह 18 ते जणांसह (Case registered against MLA Sangram Jagtap) सुमारे १०० ते १५० अनोळखी व्यक्तींविरुद्ध मिरजगाव पोलीस ठाण्यात (Mirajgaon Police Station) गुन्हा दाखल केला आहे.

हिंदू समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ ऑगस्ट रोजी चिंचोली काळदात येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची विटंबना झाल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेवरून मिरजगाव पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, या प्रकरणाच्या निषेधार्थ हिंदू समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना सोशल मीडिया आणि गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. त्यानंतर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

वाहतुकीला अडथळा झाल्याचा आरोप (Case registered against MLA Sangram Jagtap)

सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ॲड. आकाश हाळनवर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलक चिंचोली काळदात फाटा चौकात जमले. त्यांनी रस्त्यावर बसण्याचा प्रयत्न करत घोषणाबाजी सुरू केली. पोलिसांनी जिल्हादंडाधिकाऱ्यांनी ७ ऑगस्ट रोजी लागू केलेल्या जमावबंदी आदेशाची माहिती देत आंदोलन न करण्याचे आवाहन केले. तसेच मागण्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रश्न सोडविण्याचे आवाहनही करण्यात आले.

उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी आंदोलन सुरूच ठेवल्याचे पोलिसांनी फिर्यादीत नमूद केले आहे. त्यामुळे श्रीगोंदा-जामखेड महामार्ग तसेच कर्जत-मिरजगाव मार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याचा आरोप आहे.

या आंदोलनाला आमदार संग्राम जगताप तसेच धवलसिंह मोहिते, सोलापूर यांची उपस्थिती होती. दोघांनीही आंदोलनात सहभागी होऊन भाषणे केल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणी ॲड. आकाश हाळनवर, शुभम माने, चंदनसिंग परदेशी, नितीन तोरडमल, वैभव काळदाते, सावन शेटे, उदयसिंग परदेशी, दीपक गांगर्डे, विठ्ठलसिंह शेडगे, रघुआबा काळदाते, धनंजय बांदल, बाळासाहेब निंबोरे, राहुल मते, प्रसाद कानगुडे, बालाजी लाळगे, सुनील यादव आणि ऋषीकेश काळदाते यांच्यासह अन्य व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिरजगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत.