
बेकायदेशीर रिक्षा वाहतूक, आरटीओतील कथित आर्थिक लूट थांबवण्याची मागणी.
Hunger strike for the demands of rickshaw drivers and owners : अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्हा ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या (Ahilyanagar District Auto-Rickshaw and Taxi Drivers-Owners Association) वतीने रिक्षाचालक-मालकांच्या विविध मागण्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर उपोषण सुरू (Hunger strike for the demands of rickshaw drivers and owners) करण्यात आले आहे. संघटनेचे कार्याध्यक्ष विलास कराळे यांच्या उपस्थितीत हे उपोषण सुरू करण्यात आले असून, शासनाने रिक्षाचालकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.
शहरात परवानगी नसलेल्या, स्क्रॅप झालेल्या तसेच इतर जिल्ह्यांतून आलेल्या रिक्षांकडून होत असलेली कथित बेकायदेशीर प्रवासी वाहतूक तातडीने बंद करावी, अशी प्रमुख मागणी संघटनेने केली आहे. अशा रिक्षांवर वाहतूक शाखा, प्रादेशिक परिवहन विभाग व पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करून बेकायदेशीर वाहतूक रोखावी, अशी मागणी करण्यात आली.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, अहिल्यानगर शहरात इतर जिल्ह्यांतील क्रमांकाच्या काही रिक्षा रात्रीच्या वेळेत मोठ्या प्रमाणात व्यवसाय करीत आहेत. काही रिक्षाचालकांकडून मद्यप्राशन करून वाहन चालविणे तसेच प्रवाशांची लूटमार करण्यासारखे प्रकार होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे अशा रिक्षांची तपासणी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
आरटीओतील कथित आर्थिक लूट थांबविण्याची मागणी
अहिल्यानगर प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनधारकांची एजंटांच्या माध्यमातून कथित आर्थिक लूट होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. वाहनधारकांची कामे थेट, पारदर्शक आणि विना-एजंट पद्धतीने करून द्यावीत. रिक्षाचालकांना विविध कामांसाठी एजंटांच्या माध्यमातून फिरण्याची वेळ येऊ नये, यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
निवेदनातून करण्यात आली मागणी (Hunger strike for the demands of rickshaw drivers and owners)
परवानाधारक रिक्षांच्या पासिंगसाठी बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे तीन दिवस निश्चित करून त्या दिवशी रिक्षाचालकांना मार्गदर्शन व मदत करण्यासाठी आरटीओतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. रिक्षांसाठी ट्रकच्या रांगेपासून स्वतंत्र व्यवस्था करून पासिंगची प्रक्रिया सुलभ करावी, अशीही मागणी संघटनेने केली आहे.
मराठी भाषिक वाहनधारकांना कार्यालयीन कामकाजात कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. परवाना व बॅच देताना नियमांचे काटेकोर पालन करावे आणि कोणत्याही गैरप्रकाराला थारा देऊ नये, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
रिक्षाचालक-मालकांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटना सातत्याने लढा देत राहणार असून, त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळेपर्यंत शासनदरबारी पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. यासंदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडेही निवेदनाद्वारे मागण्या मांडण्यात आल्या आहेत.
यावेळी गणेश आटोळे, अशोक औशीकर, फारुक शेख, अन्वर शेख, बाळासाहेब साळवे, वसंत कोकाटे, प्रकाश तोरणमल, सुधाकर साळवे, दत्ता वामन, नासिर खान, सतीश मेंगाळ, अनिल वैरागर, सचिन जाधव, अशोक राहीन, रवींद्र कर्डक, विलास मिसाळ, गोरख आंबेकर, पोपट कांडेकर, दिलीप गायकवाड, दीपक गहिले, जुनेद बागवान, किशोर कुलट यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


