Local Crime Branch : संगमनेरमध्ये गोवंशीय जनावरांच्या कत्तलीचा डाव उधळला; स्थानिक गुन्हे शाखेकडुन ११ जनावरांची सुटका

Local Crime Branch : संगमनेरमध्ये गोवंशीय जनावरांच्या कत्तलीचा डाव उधळला; स्थानिक गुन्हे शाखेकडुन ११ जनावरांची सुटका

0

Local Crime Branch : नगर : संगमनेर शहरातील (Sangamner City) रहेमतनगर परिसरात कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या ११ गोवंशीय जनावरांची (Slaughter of bovine animals) स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने सुटका केली. या कारवाईत सुमारे १ लाख ७० हजार रुपये किमतीची जनावरे ताब्यात घेण्यात आली आहेत. ही कारवाई सोमवारी (ता. १७) करण्यात आली.

कत्तलीसाठी अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई

अहिल्यानगर जिल्ह्यात गोवंशीय जनावरांची कत्तल तसेच कत्तलीसाठी त्यांची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पथक तयार केले. या पथकातील अधिकारी व कर्मचारी संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांबाबत माहिती घेत असताना रहेमतनगरजवळील आर. के. प्लॉटिंगच्या बाजूला काटवनात काही गोवंशीय जनावरे बांधून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

११ गोवंशीय जनावरे बांधून ठेवलेली आढळली(Local Crime Branch)

माहितीची खातरजमा करण्यासाठी पथकाने पंचांसमक्ष घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तेथे लहान-मोठी अशी एकूण ११ गोवंशीय जनावरे चारा-पाण्याविना बांधून ठेवलेली आढळून आली. ही जनावरे कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पथकाने सर्व ११ जनावरे ताब्यात घेतली. घटनास्थळाच्या परिसरातील नागरिकांकडे जनावरांच्या मालकाबाबत चौकशी केली असता ठोस माहिती मिळाली नाही. जनावरांच्या मालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव तसेच पोलीस अंमलदार गणेश लोंढे, योगेश कर्डिले, बाळासाहेब गुंजाळ आणि रोहित येमुल यांच्या पथकाने केली.