
Assault on a minor girl : पाथर्डी : पाथर्डी तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय नवीत शकणाऱ्या अल्पवयीन मुलीला दुचाकीवरून बाहेर घेऊन जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार (Assault on a minor girl) केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून (Complaint) तिच्या परिचित अंजाबापु महादेव सरग या तरुणाविरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात (Pathardi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरालगतच्या परिसरात नेऊन अत्याचार केल्याचा आरोप
पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार, संबंधित तरुणाची मुलीशी काही महिन्यांपूर्वी तिच्या कुटुंबाच्या शेतातील कामाच्या निमित्ताने ओळख झाली होती. त्यानंतर तो तिच्याशी मोबाईलवरून संपर्क साधत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. १५ ऑगस्ट रोजी शाळेतील ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर मुलगी वसतिगृहात गेली होती. त्यावेळी संबंधित तरुणाने तिला फोन करून बाहेर बोलावून घेतले. त्यानंतर दुचाकीवरून तिला शहरालगतच्या एका परिसरात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप मुलीने फिर्यादीत केला आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
जीवे मारण्याची धमकी (Assault on a minor girl)
यावेळी विरोध केल्यावर तिला व तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. घटनेनंतर मुलगी वसतिगृहात परतल्यानंतर वसतिगृहातील कर्मचाऱ्यांना संशय आल्याने तिची विचारपूस करण्यात आली. त्यानंतर पालकांना बोलावून घेण्यात आले. पालकांनी विचारणा केल्यानंतर मुलीने घडलेला प्रकार सांगितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी १८ ऑगस्ट रोजी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी अंजाबापु महादेव सरग संशयिताविरुद्ध कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे हे तपास करत आहे.


