
Kotwali Police Station : नगर : पुणे बसस्थानक (Pune Bus Station) परिसरातून एका प्रवाशाला दुचाकीवरून उचलून बुरुडगाव रोडवरील निर्जनस्थळी नेऊन मारहाण करत मोबाईल व रोकड लुटणाऱ्या दोघांना कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police Station) अवघ्या काही तासांत ताब्यात घेतले. आरोपींकडून मोबाईल, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा सुमारे ७२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे
अभिषेक सुनिल शिरसाठ (वय २३, रा. अंबर अपार्टमेंट, सावेडी रोड, अहिल्यानगर) आणि अनुश शांतवन धिवर (रा. संत ज्ञानेश्वर अपार्टमेंट, महापौर उदयन यांच्या शेजारी, सावेडी, अहिल्यानगर) अशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
लाकडी दांडक्याने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण (Kotwali Police Station)
या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात १८ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी पुणे बसस्थानक परिसरात असताना आरोपींनी त्यांना बुरुडगाव रोड परिसरातील निर्जनस्थळी नेले. तेथे लाकडी दांडक्याने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या खिशातील मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. त्यानंतर मोबाईल व फोन-पेचा पासवर्ड घेऊन त्यांच्या खात्यातून ७ हजार १०० रुपये अनोळखी खात्यावर वर्ग करण्यात आले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला तेथेच सोडून पलायन केले.
घटनेनंतर कोतवाली पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. तसेच तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपींचा शोध घेण्यात आला. या तपासातून दोन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अभिषेक सुनिल शिरसाठ (वय २३, रा. अंबर अपार्टमेंट, सावेडी रोड, अहिल्यानगर) आणि अनुश शांतवन धिवर (रा. संत ज्ञानेश्वर अपार्टमेंट, महापौर उदयन यांच्या शेजारी, सावेडी, अहिल्यानगर) अशी आहेत. आरोपींनी हा गुन्हा त्यांचा साथीदार प्रविण शेजवळ (रा. कोंढवड, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) याच्यासह केल्याचे पोलिसांना सांगितले. गुन्ह्याच्या वेळी दुचाकी वापरल्याचेही तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी आरोपींकडून एकूण ७२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोसई दीपक मेढे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख, दीपक मेढे, पोलीस अमलदार बाळकृष्ण दौड, रोहिणी दरंदले, राहुल शिंदे, विनोद बोरगे, साबीर शेख, विशाल दळवी, दीपक रोहकले, शिरीष तरटे, सुरज कदम, सत्यम शिंदे, दत्तात्रय कोतकर, अतुल काजळे, अमोल गाडे, सचिन लोळगे, महेश पवार, रमेश शिंदे, संकेत धिवर, अतुल लाटे, पोकॉ रोहित ठोंबे, पल्लवी रोहकले तसेच दक्षिण मोबाईल सेलचे पोकॉ राहुल गुंडु यांच्या पथकाने केली आहे.


