MCOCA : धामोडी फाटा हत्याकांडातील सूत्रधारांचा शोध घेऊन मकोका अंतर्गत कारवाईची मागणी

MCOCA : धामोडी फाटा हत्याकांडातील सूत्रधारांचा शोध घेऊन मकोका अंतर्गत कारवाईची मागणी

0
MCOCA : धामोडी फाटा हत्याकांडातील सूत्रधारांचा शोध घेऊन मकोका अंतर्गत कारवाईची मागणी
MCOCA : धामोडी फाटा हत्याकांडातील सूत्रधारांचा शोध घेऊन मकोका अंतर्गत कारवाईची मागणी

MCOCA : अकोले : तालुक्यातील धामोडी फाटा येथे २६ जुलै, २०२६ रोजी सचिन किसन वाकचौरे (वय ३६) यांची निर्घृण हत्या (Brutal Murder) करण्यात आली होती. हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांचा मृतदेह हातपाय बांधून व नग्न अवस्थेत पिंपळगाव खांड धरणात फेकून देण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील चारही आरोपींना पोलिसांनी (Police) अटक केली असली तरी हत्येमागील खरे सूत्रधार व अन्य सहभागींचा शोध घेऊन त्यांच्यावरही मकोका अंतर्गत (MCOCA) कठोर कारवाई करावी, अशी मागणी पिंपळगाव निपाणी ग्रामस्थांनी केली आहे.

संपर्कात असलेल्या व्यक्तींच्या चौकशीची मागणी

याबाबत अकोलेचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी तसेच तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांना निवेदन देण्यात आले. आरोपींचे कॉल डिटेल्स, सोशल मीडिया बॅकअप तसेच बँक खात्यांची सखोल चौकशी करून त्यांच्याशी संपर्कात असलेल्या व्यक्तींचीही चौकशी करावी. तपासात सहभाग आढळल्यास संबंधितांना सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणातील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या आरोपी व संबंधितांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषण (MCOCA)

दरम्यान, पिंपळगाव निपाणी परिसरात दारू दुकान तसेच उत्खनन (खाणपट्टा) यांना परवानगी देऊ नये, अशी मागणीही करण्यात आली आहे. त्यामुळे शासनाचा उत्पादन शुल्क किंवा रॉयल्टीच्या माध्यमातून महसूल बुडत असल्यास त्याच्या दीडपट रकमेचा भरणा पिंपळगाव निपाणी ग्रामस्थ दरवर्षी १ एप्रिल रोजी शासकीय खजिन्यात करण्यास तयार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ग्रामस्थांच्या मागण्या मान्य न झाल्यास २५ ऑगस्ट २०२६ पासून ग्रामपंचायत पिंपळगाव निपाणी येथे आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.