Parner News : पारनेर : शहरातून (Parner city) जाणाऱ्या प्रमुख रस्त्याची रुंदी २२ मीटर करण्यात यावी, या मागणीसाठी शहरवासीयांनी एकमुखी भूमिका घेतली आहे. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेण्याची मोहीम सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब खेडेकर (Bhausaheb Khedekar) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली असून, या माध्यमातून प्रशासनाचे (Administration) लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
नक्की वाचा : नगर मनमाड आणि ट्रम्प विधानावर डॉ. सुजय विखे ठाम; पुराव्यांसह मांडली भूमिका
बाहेरून येणाऱ्या वाहनचालकांना मोठा फायदा
पारनेर शहराची वाढती लोकसंख्या, वाहनांची वाढती संख्या आणि शहरातील वाढती वर्दळ लक्षात घेता सध्याचा रस्ता अपुरा पडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अरुंद रस्त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी निर्माण होते. तसेच पादचारी, दुचाकीस्वार आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहराच्या भविष्यातील विकासाचा विचार करता रस्त्याचे नियोजन आताच व्यापक स्वरूपात करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.रस्ता २२ मीटरचा झाल्यास वाहतूक सुरळीत होण्याबरोबरच शहरातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होईल. व्यापारी, विद्यार्थी, नागरिक तसेच बाहेरून येणाऱ्या वाहनचालकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न केवळ वाहतुकीपुरता मर्यादित नसून शहराच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
एकत्रितपणे पाठपुरावा करण्याचा निर्धार (Parner News)
या मागणीसाठी सुरू करण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शहरातील विविध भागांतील नागरिक, व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते या मोहिमेत सहभागी होत असून, मोठ्या संख्येने स्वाक्षऱ्या जमा करून त्या संबंधित प्रशासनाकडे सादर करण्यात येणार आहेत. शासन व प्रशासनाने नागरिकांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून रस्त्याची मोजणी, आवश्यक भूसंपादन व रुंदीकरणाची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी अपेक्षा शहरवासीयांनी व्यक्त केली आहे. पारनेरच्या भविष्यातील विकासासाठी २२ मीटरचा रस्ता हा अत्यावश्यक असून, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे पाठपुरावा करण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला.



