Sugar Price Hike : साखरेच्या दरात एवढी वाढ का झाली? कारणे नेमकी काय?

0
Sugar Price Hike : साखरेच्या दरात एवढी वाढ का झाली? कारणे नेमकी काय?
Sugar Price Hike : साखरेच्या दरात एवढी वाढ का झाली? कारणे नेमकी काय?

Sugar Price Hike : पेट्रोल डिझेलच्या किमती मध्ये झालेल्या वाढीमुळे आधीच सामान्य ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच दैनंदिन वस्तू म्हणजे आपण जर पाहिलं तर तेल,दूध यापासून चहात टाकल्या जाणाऱ्या आल्याची सुद्धा किंमत वाढली आहे. ऐन श्रावण महिन्यात सण-उत्सवांना सुरुवात झाली असतानाच साखरेच्या दरवाढीने (Sugar Price Hike) सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला आहे. राज्यभरात साखरेच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. किरकोळ बाजारात ६१ रुपये किलो दराने विकली जाणारी साखर आता थेट ६५ रुपये किलोच्या पुढे (65 per kg price) पोहोचली आहे.

गेल्या २४ तासात साखरेचा दर हा ४ रुपये प्रति किलोमागे वाढला आहे. साखरेच्या दराच्या इतिहासात आजवरची ही सर्वात मोठी वाढ असल्याचे बोललं जात आहे. मात्र साखरेमध्ये दरवाढ का होतेय, याची कारणे काय आहेत ते सविस्तर पहा…

नक्की वाचा : आरोग्य कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग अनिवार्य, अन्यथा थेट पगारातून वसुली होणार!

सध्या बाजारात साखरेचा घाऊक दर ६ हजार ४०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला आहे. साखरेच्या दरात सातत्याने होत असलेली वाढ व्यापाऱ्यांसह ग्राहकांसाठी ही डोकेदुखी ठरत आहे.

कारणे काय? (Sugar Price Hike)

१.  साठा धोरण –  व्यापाऱ्यांच्या मते, साखरेच्या वाढत्या किमतींचे एक प्रमुख कारण म्हणजे सरकारचे साठा धोरण. केंद्र सरकारने सध्या साखरेच्या साठ्यावर खूप मोठी मर्यादा घातली आहे. व्यापाऱ्यांचा विश्वास आहे की, जर ही साठा मर्यादा कमी केली, तर बाजारात उपलब्धता वाढू शकते आणि किमती काही प्रमाणात नियंत्रणात ठेवता येऊ शकतात.

२.  इथेनॉल उत्पादनाचा परिणाम  – देशातील अनेक साखर कारखान्यांनी इथेनॉलचे उत्पादन वाढवण्यावर भर दिलाय. इथेनॉल उत्पादनासाठी उसाचा वापर वाढल्याने साखरेच्या दरात वाढ झाल्याचं म्हटलं जातंय. साखरेऐवजी इथेनॉल उत्पादनासाठी उसाचा काही भाग वापरला जात असल्याने साखर उत्पादनावर परिणाम झालाय. बाजारातील मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्याने त्याचा थेट परिणाम किमतींवर होतोय, असं सांगितले जात आहे.

अवश्य वाचा : अहिल्यानगरमध्ये ‘अहिल्या सरस्वती महोत्सवा’चे आयोजन

३. महाराष्ट्र आणि कर्नाटक सारख्या प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये झालेल्या अपुऱ्या किंवा अनिश्चित पावसामुळे उसाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे.

४.  सणासुदीचा काळ आणि वाढती मागणी (Sugar Price Hike)

– श्रावण महिना, गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी या सणांमुळे बाजारात मिठाई आणि इतर गोड पदार्थांसाठी साखरेची मागणी प्रचंड वाढली आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्यामुळे साखरेच्या किमती कडाडल्या आहेत

५  जागतिक बाजारातील तेजी –  आंतरराष्ट्रीय स्तरावरही साखरेचा पुरवठा विस्कळीत झाल्याने जागतिक बाजारात साखरेचे दर वाढले आहेत, ज्याचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारावर झाला आहे.

आता काही वर्षांपूर्वी साखर तुलनेने कमी दरात उपलब्ध होत होती. मात्र उत्पादन खर्च, ऊस उत्पादकांना द्यावा लागणारा दर, वाहतूक, प्रक्रिया व इतर खर्चात झालेली वाढ यामुळे बाजारातील साखरेच्या दरावर परिणाम झाला आहे. म्हणजेच एकंदरीतच आंतरराष्ट्रीय बाजारात ज्या काही घडामोडी घडत आहेत.त्याचा परिणाम प्रत्येक वस्तूच्या दरावर होताना दिसत आहे.