
Cannabis cultivation in front of the house : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील धनगरवाडी येथे घरासमोर अवैधरित्या गांजाची झाडे लावल्याप्रकरणी (Cannabis cultivation in front of the house) एमआयडीसी पोलिसांनी (MIDC Police Station) कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी (Police) तब्बल ६४.७३ किलो वजनाची गांजाची झाडे जप्त केली असून, जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे ३ लाख २३ हजार ६५० रुपये आहे. या प्रकरणी अनिल लक्ष्मण विरकर (वय ४९, रा. धनगरवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
१९ ऑगस्ट रोजी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना धनगरवाडी येथे गांजाची लागवड केल्याच्या माहितीवरून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार नगर ग्रामीण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिसांचे पथक संबंधित ठिकाणी पोहोचले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
६४.७३ किलो झाडे ताब्यात (Cannabis cultivation in front of the house)
पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता एका घरासमोर गांजाची झाडे अवैधरित्या लावल्याचे आढळून आले. या प्रकरणी घरात राहणाऱ्या अनिल विरकर याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या घरासमोरील गांजाची झाडे पोलिसांनी ताब्यात घेतली. त्यांचे एकूण वजन ६४.७३ किलो असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक बी. चौधरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे, पोलीस उपनिरीक्षक अजय कौटे, पोलीस अंमलदार सुदाम लोंढे, पोलीस हवालदार सुशांत दिवटे तसेच पोलीस कर्मचारी सचिन हरदास, उमेश शेरकर, सुरज देशमुख आणि अक्षय रोहोकले यांच्या पथकाने केली आहे.


