नगर : पुण्यात दिवसेंदिवस (Pune Crime) भोंदूबाबांचं प्रस्थ वाढताना दिसताना आहे. असच एका भोंदूबाबाचं हादरवणारं हत्याकांड उघडकीस आले आहे. २३ वर्षीय भोंदूने तरुणीला भीती दाखवून (Showed fear to the young woman) अर्धनग्न फोटो मागवल्याचा (Half naked photos) संतापजनक प्रकार समोर आला आहे. शरीरातून नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्याचा दावा करून तरुणींकडून फोटो मागवायचा. आता या भोंदूच कांड उघडकीस आल्यानंतर कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे.
नक्की वाचा : साखरेच्या दरात एवढी वाढ का झाली? कारणे नेमकी काय?
भोंदूबाबाकडून २२ वर्षीय तरुणीची फसवणूक (Pune Crime)
दिव्य जितेंद्र परमार असे अटक केलेल्या भोंदूबाबाचं नाव असून त्याने एका २२ वर्षीय तरुणीची फसवणूक केली. हा भोंदू कॉलेजमध्ये असताना स्वत:ला ‘मोटिव्हेशनल स्पीकर’ असल्याचा सांगायचा. त्याने सोशल मीडियावरही मोठा चाहता वर्ग निर्माण केला होता. सोशल मीडियावर एक चॅनेल देखील सुरू केलं होतं. खंरतर त्याने १८ व्या वर्षांपासून कांड सुरू केले होते. तो सोशल मीडियावरील कमी वयाच्या मुलींना हेरायचा. तो लोकांमध्ये जाऊन व्याख्याने देखील देऊ लागला होता. तरुणी संपर्कात आल्यानंतर त्यांना व्यायामाच्या टिप्स द्यायचा. व्यायामाच्या माध्यमातून विश्वास संपादन केल्यानंतर अर्धनग्न फोटोची मागणी करायचा. तरुणींनी फोटो देण्यास नकार दिल्यास भीती दाखवत होता.
अवश्य वाचा : आरोग्य कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग अनिवार्य, अन्यथा थेट पगारातून वसुली होणार!
कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल (Pune Crime)
भोंदू परमार सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींशी संपर्क साधायचा. आध्यात्मिक गुरू सांगून त्यांच्याशी संवाद वाढवायचा. व्यायामाच्या माध्यमातून शरीरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकायचा,असे आमिष द्यायचा. अशाच एका पीडित तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात या भोंदूंच्या विरोधात धाव घेतली. या तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी या भोंदूबाबाला अटक केली. त्याचा मोबाईल, लॅपटॉप जप्त केला आहे. आता फोटो, मेसेज,व्हिडिओच्या पुराव्याच्या आधारावर तपासणी सुरू झाली आहे. या भोंदूने आणखी किती महिला आणि तरुणींना जाळ्यात ओढले आहे, याचा तपास पोलिसांनी सुरू केलाय. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात ओरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भोंदूला अटक केल्यानंतर आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.



