Mega Blood Donation Camp : शनिवारी नगरमध्ये महारक्तदान शिबिर; अहिल्यानगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचा उपक्रम, 7,500 पिशव्या संकलनाचे उद्दिष्ट

सर्व रक्तपेढ्या या उपक्रमात सहभगी होणार

0
Mega Blood Donation Camp : शनिवारी नगरमध्ये महारक्तदान शिबिर; अहिल्यानगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचा उपक्रम, 7,500 पिशव्या संकलनाचे उद्दिष्ट
Mega Blood Donation Camp : शनिवारी नगरमध्ये महारक्तदान शिबिर; अहिल्यानगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचा उपक्रम, 7,500 पिशव्या संकलनाचे उद्दिष्ट

Mega Blood Donation Camp : नगर : अहिल्यानगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या (Ahilyanagar Mobile Retailers Association) वतीने आयोजित करण्यात येणारे महारक्तदान शिबिर (Mega Blood Donation Camp) शनिवारी (ता. 22) अहिल्यानगर शहरात आयोजित करण्यात आले आहे. याची तयारी पूर्ण झाली असून यावर्षी जिल्ह्यातून सुमारे साडेसात हजार रक्त पिशव्या संकलित करण्याचे उद्दिष्ठ ठरविण्यात आले आहे. सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत नवीन टिळक रोडवरील नंदनवन लॉन्स (Nandanvan Lawns) येथे हे महारक्तदान शिबिर होणार आहे.या महारक्तदान शिबिरास काका ट्रस्ट, आय लव्ह नगर व ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशन यांचे सहकार्य लाभले आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ठरलेल्या या रक्तदान शिबिराच्या आयोजनाचे हे सलग ५ वे वर्ष आहे. अशी माहिती मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचे राज्याचे अध्यक्ष अजित जगताप यांनी दिली.

नक्की वाचा : पारनेर शहरातील रस्त्याची रुंदी २२ मीटर करा; नागरिकांची एकमुखी मागणी

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

या शिबिराच्या आयोजनाबद्दल अधिक माहिती देताना असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अजित पवार म्हणाले, या महारक्तदान शिबिराचे उद्घाटन २२ ऑगस्टला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी स्वागताध्यक्ष आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव व उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याशिवाय जिल्हाधिकारी पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे व जिल्हा शल्य चिकित्सक संजय घोगरे यांचीही उपस्थिती लाभणार आहे. याशिवाय सर्व नगरसेवक, सर्व मोबाईल कंपन्यांचे वितरक यांच्यसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

सर्व रक्तपेढ्या या उपक्रमात सहभगी होणार (Mega Blood Donation Camp)

शिबिराचे स्वरूप सांगताना असोसिएशनचे उपाध्यक्ष गोरख पडोळे म्हणाले की, अहिल्यानगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या वतीने गेल्या ४ वर्षांपासून अविरतपणे महा रक्तदान शिबिराचे आयोजन नगरमध्ये होत आहे. गेल्यावर्षी शहरासह व ग्रामीण भागातून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे तब्बल ५,२५० रक्तपिशव्यांचे संकलन झाले होते. आता यामध्ये वाढ करून यावर्षी ऐतिहासिक लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार शहरातून ५,००० व जिल्ह्यातील इतर भागांमधून २,५०० रक्तदान असे एकूण ७,५०० हून अधिक पिशव्या रक्तदान घडवून आणण्याचा संकल्प केला आहे. यासाठी सर्व रक्तपेढ्या या उपक्रमात सहभगी होणार आहेत. रक्तदान शिबिरात महिलांचा वाढता सहभाग पाहता या शिबिरात महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती संयोजकांनी दिली.

यामध्ये मोठ्या संख्येने युवक, नागरिक व महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभगी होत जीवनदान देण्यासाठी रक्तदान करावे. सर्वांनी या मानवतावादी अभियानाला बळ द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. रक्तदान शिबिरात महिलांचा वाढता सहभाग पाहता या शिबिरात महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती संयोजकांनी दिली. यामध्ये मोठ्या संख्येने युवक, नागरिक व महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभगी होत जीवनदान देण्यासाठी रक्तदान करावे. सर्वांनी या मानवतावादी अभियानाला बळ द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

नव्या विक्रमाचे साक्षीदार व्हाः आमदार जगताप

या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे. ते म्हणाले, रक्तदान हे जीवनदान असल्याने सर्वश्रेष्ठ आहे. अहिल्यानगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या या उपक्रमाने नवे रेकॉर्ड रचले आहेत. त्यामुळे ऐतिहासिक ठरलेल्या या महारक्तदान शिबिरातही यावर्षी जास्तीत जास्त युवक, युवती व नागरिकांनी सहभागी होत कर्तव्य बजवावे. 

उद्योजक नरेंद्र फिरोदिया म्हणाले की

उद्योजक नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, अहिल्यानगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या या महारक्तदान शिबिरामुळे जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा कमी होत असल्याने असोसिएशनचा पुढाकार प्रशंसनीय आहे.या महारक्तदान शिबिराचे नियोजन अमित बुरा, संतोष बलदोटा, रितेश सोनीमंडलेचा, मनीष चोपडा, अतुल रच्चा, मनोज बरलोटा, हिरा खुबचंदानी, राकेश सोनीमंडलेचा, प्रितम तोडकर व साजिद खान आदींसह पदाधिकारी करत आहेत.