
Elderly man dies after being hit by a container truck : कोपरगाव : कोपरगाव शहरातील (Kopargaon City) पुणतांबा फाटा येथे पायी चालत जाणाऱ्या 75 वर्षीय व्यक्तीला कंटेनरने जोरदार धडक दिल्याची दुर्दैवी घटना (Elderly man dies after being hit by a container truck) रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. या अपघातात (Accident) रायभान रघुनाथ टेके (वय 75, रा. कोकमठाण) यांचा मृत्यू झाला.

प्राथमिक माहितीनुसार, मनमाडकडून नगरच्या दिशेने जाणारा कंटेनर क्रमांक UP 78 CT 7957 पुणतांबा फाट्याजवळून जात असताना रस्त्याच्या कडेला पायी चालत असलेल्या रायभान टेके यांना धडकला. या धडकेत ते गंभीर जखमी झाले.
कोपरगाव शहर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल
घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमी टेके यांना तातडीने कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
कंटेनर चालक फरार : (Elderly man dies after being hit by a container truck)
दरम्यान, अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलिसांनी कंटेनरच्या क्लीनरला ताब्यात घेतले आहे. फरार चालकाचा शोध सुरू असून, या अपघाताबाबत कोपरगाव शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.
या दुर्दैवी घटनेने कोकमठाण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


