Dr. Balasaheb Vikhe Patil Private Health Sciences University : अहिल्यानगरमध्ये होणार डॉ. बाळासाहेब विखे पाटील खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठ; मंत्रिमंडळाची मंजुरी

अहिल्यानगरमध्ये डॉ. बाळासाहेब विखे पाटील खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठ स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

0
Dr. Balasaheb Vikhe Patil Private Health Sciences University : अहिल्यानगरमध्ये होणार डॉ. बाळासाहेब विखे पाटील खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठ; मंत्रिमंडळाची मंजुरी
Dr. Balasaheb Vikhe Patil Private Health Sciences University : अहिल्यानगरमध्ये होणार डॉ. बाळासाहेब विखे पाटील खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठ; मंत्रिमंडळाची मंजुरी

Dr. Balasaheb Vikhe Patil Private Health Sciences University : नगर : राज्य मंत्रिमंडळाची आज, (ता. 24) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) अध्यक्षतेखाली विविध निर्णय जाहीर करण्यात आले. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यासाठी (Ahilyanagar District) महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, डॉ. बाळासाहेब विखे पाटील खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठ (Vikhe Patil Private Health Sciences University) स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

या निर्णयामुळे अहिल्यानगरमध्ये आरोग्य विज्ञान क्षेत्रातील उच्च शिक्षणाच्या संधी वाढणार आहेत. प्रस्तावित विद्यापीठामध्ये वैद्यकशास्त्र, दंतवैद्यक, फिजिओथेरपी आणि नर्सिंग या प्रमुख विद्याशाखांमध्ये विविध अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.

नक्की वाचा : रूपाली चाकणकरांच्या तक्रारीनंतर १९ जणांवर गुन्हा; अंधारे, रुपाली ठोंबरे, संगीता तिवारींचा समावेश

आरोग्य शिक्षणाच्या सुविधा वाढणार

डॉ. बाळासाहेब विखे पाटील खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठात विद्यार्थ्यांना आरोग्य विज्ञानाशी संबंधित विविध अभ्यासक्रमांची संधी उपलब्ध होणार आहे. येथे पदवी, पदव्युत्तर तसेच सुपर स्पेशॅलिटी अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन आहे. वैद्यकशास्त्रासोबतच दंतवैद्यक, फिजिओथेरपी आणि नर्सिंग या क्षेत्रातील शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे अहिल्यानगरसह आसपासच्या जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. आरोग्य शिक्षणाच्या सुविधा वाढणार आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पदवीपासून सुपर स्पेशॅलिटीपर्यंत अभ्यासक्रम (Dr. Balasaheb Vikhe Patil Private Health Sciences University)

अहिल्यानगरमध्ये खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठ स्थापन झाल्याने वैद्यकीय आणि आरोग्य क्षेत्रातील उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना अधिक पर्याय उपलब्ध होतील. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासोबतच सुपर स्पेशॅलिटी अभ्यासक्रमांची सुविधा मिळणार असल्याने या क्षेत्रातील मनुष्यबळ निर्मितीलाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उच्च व तंत्रशिक्षणासह विविध विभागांशी संबंधित अनेक प्रस्तावांवर निर्णय घेण्यात आले. त्यापैकी अहिल्यानगरमध्ये डॉ. बाळासाहेब विखे पाटील खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठ स्थापनेचा निर्णय हा जिल्ह्याच्या शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.

मंत्रीमंडळाने घेतलेले उर्वरीत निर्णय

● क्रीडा विभाग : आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातील खेळाडू व त्यांचे क्रीडा प्रशिक्षक यांना दिल्या जाणाऱ्या रोख बक्षीस धोरणात सुधारणा.

● उच्च व तंत्रशिक्षण विभाग : नागपूर येथे लता मंगेशकर विद्यापीठ स्थापन होणार.

● महसूल व वन विभाग : जत नगरपरिषदेला प्रशासकीय इमारत उभारणीसाठी मौजे जत (जि. सांगली) येथील 2585 चौ. मीटर शासकीय जमीन देण्यास मान्यता.

● विधि व न्याय : नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) होणार. त्यासाठीची पदे व अनुषंगिक खर्चाच्या तरतुदीस मान्यता.