Dheeraj Pardeshi Murder Case : नगर: महापालिकेचे कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी (Dheeraj Pardeshi Murder Case) पसार असलेल्या आणखी एका संशयित आरोपीला भिंगार कॅम्प पोलिसांनी (Bhingar Camp Police) जेरबंद केले. अबजीमिया याकूब सय्यद (रा. आलमगीर) असे जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) दिली आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 13 संशयित आरोपी निष्पन्न झाले आहेत. त्यापैकी 11 जणांना अटक करण्यात आली होती. अबजीमिया सय्यद हा पसार होता. त्याचा भिंगार पोलिसांनी शोध घेऊन त्याला अटक केली आहे.
पाच संशयित आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत
दरम्यान, पोलीस कोठडीत असलेल्या पाच संशयित आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 13 संशयित आरोपी निष्पन्न झाले आहेत. त्यापैकी 11 जणांना अटक करण्यात आली होती. अबजीमिया सय्यद हा पसार होता. त्याचा भिंगार पोलिसांनी शोध घेऊन त्याला अटक केली आहे. त्याच्याकडील तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पसार आरोपीची शोध सुरुच (Dheeraj Pardeshi Murder Case)
दरम्यान, अटकेतील पाच संशयित आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी (ता.24) संपत असल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील आणखी एक आरोपी पसार असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.



