
Safe rescue of an abducted minor girl : कोपरगाव : कोपरगावातून पळवून नेलेल्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहिल्यानगर येथून सुखरूप सुटका (Safe rescue of an abducted minor girl) केली. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. दिनांक १८ ऑगस्ट २०२६ रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात (Kopargaon City Police Station) याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यासाठी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे (Local Crime Branch) पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात येऊन गांभीर्याने तपास सुरू करण्यात आला होता.
मदत करणारा साथीदारही ताब्यात
सदर तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी व संशयित आरोपी दरेवाडी, सोलापूर रोड, अहिल्यानगर परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुलीची सुखरूप सुटका केली.
या प्रकरणी नूर राजू पठाण वय १९, रा. आंबेडकर नगर, राहाता याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, कोपरगाव येथून अहिल्यानगर येथे पळून येण्यासाठी समीर मनोज सोनगत वय २२, रा. हरीमळा, दरेवाडी, ता. अहिल्यानगर याने मदत केल्याचे समोर आले. त्यानंतर समीर सोनगत यालाही ताब्यात घेण्यात आले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
यांच्या पथकाने केली कारवाई (Safe rescue of an abducted minor girl)
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार अरुण गांगुर्डे, फुरकान शेख, अशोक लिपणे, अजिनाथ पाखरे, रणजीत जाधव, अमृत आढाव, अभिजीत आरकल, महिला पोलीस अंमलदार चिमा काळे आणि किरण ठुबे यांच्या पथकाने केली.
दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.


