नगर : नुकतीच ‘मिस युनिव्हर्स इंडिया २०२६’ (Miss Universe India 2026) च्या सौंदर्यस्पर्धेच्या विजेतीची घोषणा करण्यात आली आहे. केरळच्या केझिया लिझ मेजोने हा किताब पटकावला आहे. मात्र या स्पर्धेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने (Urvashi Rautela Troll). या कार्यक्रमात उर्वशीने भारतीय तिरंग्याच्या रंगांचा पोशाख परिधान करुन एण्ट्री घेतली. मात्र,या पोशाखामुळे तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागलाय. या कार्यक्रमातील तिचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Video)झाला. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करून हा तिरंग्याचा अपमान असल्याचे म्हटले आहे. मात्र राष्ट्रध्वजासारखे असलेले कपडे आपण परिधान करू शकतो का? आणि याबाबत कायदा काय सांगतो (What the law says) हे आज आपण पाहू…
नक्की वाचा : केंद्र सरकारने उचलले मोठं पाऊल, १० लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्क मुक्त आयातीला परवानगी
नेमकं काय घडलं? (Urvashi Rautela Troll)

अभिनेत्री उर्वशी रौतेला ही ‘मिस युनिव्हर्स इंडिया २०२६’ स्पर्धेत परीक्षक म्हणून सहभागी झाली होती. या स्पर्धेच्या परीक्षक मंडळात माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन आणि सेलिना जेटली यांचाही समावेश होता.यावेळी उर्वशीने रॅम्प वॉक केला आणि प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या कार्यक्रमासाठी तिने तिरंग्यापासून प्रेरित असा गाउन परिधान केला होता. यात केशरी, पांढरा आणि हिरवा रंग असून मध्यभागी अशोक चक्राची डिझाइन होती. मात्र, या पोशाखामुळे अनेक युजर्सनी अशा प्रकारे तिरंग्याचा वापर करणे हे नियमांचे उल्लंघन असल्याचं म्हणत आहे. यामुळे उर्वशी रौतेला पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
अवश्य वाचा : लाडकी बहीण योजनेबाबत मोठा खुलासा,आरटीआयमधून धक्कादायक माहिती समोर
तिरंग्यासारखे असलेले कपडे परिधान केल्यास कायदा काय सांगतो? (Urvashi Rautela Troll)
तिरंगा हा आपल्या देशाच्या अस्मितेचा आणि प्रतिष्ठेचा प्रतीक आहे. त्यामुळे त्याचा आदर राखणे हे आपले कर्तव्य आणि जबाबदारी आहे. कायद्यानुसार,आपला राष्ट्रध्वज असलेल्या तिरंग्यापासून बनवलेले कपडे परिधान करणे बेकायदेशीर आहे. तीन रंगांचा समावेश असलेला भारताचा राष्ट्रध्वज हे स्वातंत्र्याचे प्रतीक आहे; त्यापासून तयार केलेले कपडे परिधान करणे हा राष्ट्रीय ध्वजाचा अपमान मानला जातो आणि त्यासाठी शिक्षा होऊ शकते.
‘राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंधक कायद्या’च्या कलम २ नुसार, तिरंगा हा फॅशन स्टेटमेंट किंवा सजावटीची वस्तू नाही. त्यामुळे तिरंग्याचा वापर कपडे, पोशाख किंवा गणवेश म्हणून करता येत नाही. तसेच, अंतर्वस्त्रे, रुमाल, नॅपकिन्स, उशा इत्यादींवर ही त्याचे मुद्रण करता येत नाही. ‘राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंधक कायदा, १९७१ अंतर्गत, तिरंग्याचा जाणीवपूर्वक अपमान केल्यास तीन वर्षांपर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. मंडळी, फक्त केशरी, पांढरा आणि हिरवा हे तीन वेगवेगळे रंग स्वतंत्रपणे किंवा एकत्र फॅशन म्हणून वापरण्यास कायद्याची बंदी नाही.
(उदा. पांढरा कुर्ता आणि तिरंगी दुपट्टा) जर तुम्ही परिधान करणार असाल तर. परंतु, थेट राष्ट्रध्वजाची हुबेहूब नक्कल करून किंवा त्यावर अशोक चक्र व ध्वजाचे स्वरूप देऊन तो अंगाखांद्यावर किंवा शरीराच्या खालच्या भागात कपड्यांच्या स्वरूपात वापरणे बेकायदेशीर ठरते. त्यामुळे तुम्ही जर तिरंगा पोशाख परिधान करण्यास इच्छुक असाल तर हे नियम नक्की जाणून घ्या. जेणेकरून कोणत्याही प्रकारची विटंबना न होता राष्ट्र ध्वजाचा आदर तुम्ही करू शकाल आणि तुम्हाला कोणीही ट्रोल करणार नाही.



