
NHAI team inspects accident-prone spots : नगर : अहिल्यानगर-दौंड महामार्गावरील (Ahilyanagar-Daund Highway) दुभाजकावर मोठ्या प्रमाणात वाढलेल्या झाडांमुळे वाहनचालकांना अडथळा निर्माण होत असून, रस्ता ओलांडताना होणाऱ्या अपघातांच्या (Accident) पार्श्वभूमीवर पुणे येथील भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) पथकाने मंगळवारी महामार्गाची पाहणी केली. संबंधित ठिकाणी लवकरात लवकर आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे पथकाने सांगितले.

पुणे येथील NHAI विभागाचे पथक अहिल्यानगरमध्ये दाखल
यावेळीप्रभाग क्रमांक १७ मधील नगरसेवक मयूर बांगरे, मनोज कोतकर, जालिंदर कोतकर आणि सुमित लोंढे यांनी या समस्येबाबत NHAI कडे वारंवार पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीची दखल घेत पुणे येथील NHAI विभागाचे पथक अहिल्यानगरमध्ये दाखल झाले आणि प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीमध्ये NHAIचे अतिरिक्त उपविभागीय अभियंता अतुल सुर्वे, शाखा अभियंता किरण गोडसे तसेच एसीसी इन्फ्रास्ट्रक्चरचे पवन कुमार उपस्थित होते.

दुभाजकाची व्यवस्था नसल्याने धोका (NHAI team inspects accident-prone spots)
अहिल्यानगर शहरातील कायनेटिक चौक, कायनेटिक आर्म, कायनेटिक कंपनी परिसर ते आरणगावपर्यंत पथकाने पाहणी केली. महामार्गाच्या दुभाजकावर वाढलेली झाडे, तसेच केडगाव लिंक रोड जोडलेल्या ठिकाणी दुभाजकाची व्यवस्था नसल्याने निर्माण झालेला धोका याची पाहणी करण्यात आली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
केडगाव लिंक रोड जोडलेल्या ठिकाणी दुभाजक नसल्यामुळे नागरिकांना रस्ता ओलांडताना महामार्गावरील वेगवान वाहतुकीचा सामना करावा लागतो. त्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होत असून, अनेकांना जीव गमवावा लागल्याचे स्थानिकांनी पथकाच्या निदर्शनास आणून दिले. प्रभाग क्रमांक १७ मधील नगरसेवक मयूर बांगरे, मनोज कोतकर, जालिंदर कोतकर आणि सुमित लोंढे यांनी या समस्येबाबत NHAI कडे वारंवार पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीची दखल घेत पुणे येथील NHAI विभागाचे पथक अहिल्यानगरमध्ये दाखल झाले आणि प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीमध्ये NHAIचे अतिरिक्त उपविभागीय अभियंता अतुल सुर्वे, शाखा अभियंता किरण गोडसे तसेच एसीसी इन्फ्रास्ट्रक्चरचे पवन कुमार सहभागी झाले होते.
महामार्गावरील दुभाजकावरील झाडांची छाटणी, धोकादायक ठिकाणी आवश्यक सुरक्षा व्यवस्था आणि रस्ता ओलांडण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याबाबत लवकरच कार्यवाही केली जाईल, असे पथकाकडून सांगण्यात आले. त्यामुळे या मार्गावरील अपघातांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.


