All India Marathi Literary Conference : १०० वे साहित्य संमेलन मराठी भाषेच्या दीर्घ आणि समृद्ध प्रवासाचा सुवर्णक्षण असेल : योगेश सोमण

शंभराव्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अहिल्यानगर जिल्ह्यात साहित्यिकांचा स्नेह मेळावा उत्साहात

0
All India Marathi Literary Conference : १०० वे साहित्य संमेलन मराठी भाषेच्या दीर्घ आणि समृद्ध प्रवासाचा सुवर्णक्षण असेल : योगेश सोमण
All India Marathi Literary Conference : १०० वे साहित्य संमेलन मराठी भाषेच्या दीर्घ आणि समृद्ध प्रवासाचा सुवर्णक्षण असेल : योगेश सोमण

All India Marathi Literary Conference : नगर : १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (All India Marathi Literary Conference) पुणे येथे होणार आहे. त्या निमित्ताने या संमेलनाचे निमंत्रण देण्यासाठी संपूर्ण भारतभर व विदेशात एकूण ९९ नांदी संमेलन संपन्न होत आहेत. ही नांदी संमेलन (Nandi Sammelan) म्हणजे नव्या पर्वाचा आरंभ आहे. मराठी रसिक वाचक लेखक साहित्यिक आणि सर्वांनाच त्या त्या शहरात त्या त्या भागात राहणाऱ्या नागरिकांना शंभराव्या संमेलनाचे हे निमंत्रण आहे. त्यासाठी अशा प्रकारची संमेलने आयोजित करण्यात आली आहेत.

या संमेलनाच्या माध्यमातून लेखक साहित्यिक कलावंत कलाकार कवी यांना त्यांच्या कलेला संधी देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ही संमेलन त्या त्या भागात आयोजित केली आहेत. मुख्य संवेदनाचा पाया रचणाऱ्या आणि साहित्याचा जागर करणारे व सर्वांनाच या नांदी संमेलनाच्या निमित्ताने सर्व रसिकांना निमंत्रण देण्यात येत आहेत. असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण (Yogesh Soman) यांनी नगर येथे आयोजित स्नेह मेळाव्यात आपली संमेलनाची भूमिका स्पष्ट केली.

All India Marathi Literary Conference : १०० वे साहित्य संमेलन मराठी भाषेच्या दीर्घ आणि समृद्ध प्रवासाचा सुवर्णक्षण असेल : योगेश सोमण
All India Marathi Literary Conference : १०० वे साहित्य संमेलन मराठी भाषेच्या दीर्घ आणि समृद्ध प्रवासाचा सुवर्णक्षण असेल : योगेश सोमण

नक्की वाचा : मराठा समाजाच्या मागण्याबाबत संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करावी : राधाकृष्ण विखे

लेखक, साहित्यिक, वाचक मोठ्या संख्येने उपस्थित

अहिल्यानगर जिल्ह्याचा स्नेह मेळावा नुकताच आयरिश हॉटेल येथील सभागृहात मोठ्या उत्साहात झाला यावेळी नगर जिल्ह्यातील सर्व महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाखांचे प्रमुख पदाधिकारी लेखक, साहित्यिक, वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्वांना त्यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावेडी उपनगर शाखेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया हे होते या स्नेह मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचे अध्यक्ष योगेश सोमण , कोषाध्यक्ष गजलकार प्रदीप निफाडकर, विभागीय कार्यवाह जयंत येलुलकर, जिल्हा प्रमुख प्रा गणेश भगत , व समन्वयक निखिल पाटील आदी उपस्थित होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

नरेंद्र फिरोदिया यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान (All India Marathi Literary Conference)

यावेळी विचारपीठावरील मान्यवरांचा विभागीय कार्यवाह जयंत येलुलकर व जिल्हाप्रमुख प्रा गणेश भगत यांनी यथोचित सत्कार सन्मान केला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांचा त्यांच्या योगदानाबद्दल नगर जिल्ह्यातील सर्व साहित्यिक लेखक व शाखांच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
साहित्य स्नेह  मेळाव्याची सुरुवात व्यासपीठावरील मान्यवरांना औक्षण करून करण्यात आली. यावेळी 99 नांदी संमेलनांपैकी सहा नांदी संमेलन अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध तालुक्यात संपन्न होणार आहेत व त्याची भूमिका त्याच स्वरूप याविषयी आपल्या मनोगतातून समन्वयक निखिल पाटील यांनी माहिती दिली.

योगेश सोमण म्हणाले की

यावेळी बोलताना अध्यक्ष योगेश सोमण हे म्हणाले की 99 नांदी संमेलनाच्या माध्यमातून त्या त्या भागामध्ये देशभर निमंत्रण देण्याचे कार्य केले जाणार आहे . मराठी भाषेचे शंभरावे संमेलन संपन्न होत आहे ही अभिमानाची व आश्चर्यजनक बाब आहे त्यामुळे या शंभराव्या संमेलनाकडे जगाचे लक्ष लागलेले आहे त्यामुळे हे संमेलन अतिशय अभूतपूर्व अशा प्रकारचे संपन्न होणार असून यासाठी महाराष्ट्रातून आणि देशातून मोठ्या संख्येने साहित्य रसिक वाचक उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण देण्याचे कार्य करत आहोत यासाठी आमचे जिल्हाप्रमुख हे त्या त्या भागामध्ये समन्वय साधून अतिशय चांगल्या प्रकारे नांदी संमेलन संपन्न करणार आहेत व आपल्या भागातील लेखक वाचक साहित्यिकांना निमंत्रण देणार आहेत सर्वांनी या संमेलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे. तसेच नांदी संमेलनाची भूमिका व स्वरूप यावेळी त्यांनी सविस्तर विशद केली.

नगरशी अतिशय जुना स्नेह संबंध: प्रदीप निफाडकर

प्रदीप निफाडकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की माझा नगरशी अतिशय जुना स्नेह संबंध आहे त्यामुळे नगरमध्ये अतिशय प्रभावीपणे आपण हे संमेलन पार पाडावीत जेणेकरून नगर शहरातून मोठ्या संख्येने नागरिकांनी या संमेलनात हजेरी लावून शंभराव्या संमेलनाची साक्षीदार व्हावेत अशा प्रकारची भूमिका विचार मांडले. व नांदी संमेलनासाठी शुभेच्छा दिल्या.

लेखक, वाचक, साहित्यिकांना विचारपीठ व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू: नरेंद्र फिरोदिया

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना सांगितले की नगर शाखा व उपनगर शाखा असा आमच्यामध्ये भेद नसून नगर शहरात या दोन्ही मिळून एकच शाखा आहे असे आम्ही म्हणतो तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जी संमेलन होणार आहेत ती अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट होतील येथील लेखक, वाचक, साहित्यिकांना अतिशय चांगल्या प्रकारे विचारपीठ व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू व ही संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्वांना या संमेलनामध्ये जोडून घेतले जाईल असे यावेळी सांगितले.

जिल्ह्याला मोठा साहित्य वारसा

विभागीय कार्यवाह जयंत येलुलकर यांनी  अहिल्यानगर जिल्ह्याला मोठा साहित्य वारसा आहे.1997 मध्ये येथे संपन्न झालेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे साहित्य विश्वाला दिशा देणारे ठरले होते.अहिल्यानगर जिल्ह्यातील संमेलन उत्तम आयोजन, साहित्यिकांच्या, रसिकांच्या सहभागाने यशस्वी होईल यासाठी सर्वजण परिश्रम घेतील व अतिशय उत्कृष्टपणे अहिल्यानगर जिल्ह्याचे कार्य असेल असे सांगितलेनगरच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारी ऐतिहासिक पर्वणी आहे. हा स्नेहमेळावा म्हणजे या दोन्ही महासोहळ्यांची यशस्वी ‘नांदी’ आहे,” असे मत व्यक्त केले. नगरकरांनी या संमेलनांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

यावेळी 99 नांदी संमेलनांपैकी सहा नांदी संमेलन अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध तालुक्यात संपन्न होणार आहेत व त्याची भूमिका त्याच स्वरूप याविषयी माहिती समन्वयक निखिल पाटील यांनी दिली.या मेळाव्याला राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील तसेच नगर जिल्ह्यातील विविध साहित्य परिषदेच्या शाखांचे अध्यक्ष व त्यांचे सर्व पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय उत्साहात , व अलोट गर्दीमध्ये हा साहित्यिक स्नेह मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रंचलन जिल्हाप्रमुख प्रा .गणेश भगत यांनी केले .मेळाव्यासाठी शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन यांचे सहकार्य लाभले.