Nepal Floods : नगर : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या (Nepal Floods) पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिक (Citizens of Maharashtra) आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी (Tourist Safety) राज्य शासनाने (State Government) आपत्कालीन उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याच अनुषंगाने अहिल्यानगर जिल्हा प्रशासनानेही जिल्ह्यातील नेपाळमध्ये अडकलेले नागरिक, पर्यटक किंवा ज्यांचा आपल्या कुटुंबीयांशी संपर्क होत नाही, अशा व्यक्तींची माहिती तातडीने संकलित करण्याचे आवाहन केले आहे.

पोर्टलवर माहिती नोंदविण्याचे आवाहन
महाराष्ट्र शासनाच्या ‘सहायता’ इमर्जन्सी इव्हॅक्युएशन रजिस्ट्रेशन पोर्टलवर संबंधित व्यक्तीची माहिती नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी घाबरून न जाता उपलब्ध माहिती अचूक आणि संपूर्ण स्वरूपात पोर्टलवर भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे. आवश्यकता भासल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांच्याशीही संपर्क साधता येईल.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
मदतीसाठी १०७७/०२४१-२३२३८४४ वर संपर्काचे आवाहन (Nepal Floods)
पोर्टलवर नागरिकाचे नाव, पासपोर्ट क्रमांक, मोबाइल किंवा व्हॉटसॲप क्रमांक, महाराष्ट्रातील पत्ता, जिल्हा, आपत्कालीन संपर्क क्रमांक, व पत्ता, लोकेशन, व्हिसाची नेपाळमधील सध्याचे शहर माहिती, सोबत असलेल्या व्यक्तींची संख्या आणि जवळचे विमानतळ यासह आवश्यक माहिती भरता येणार आहे. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती असल्यास त्याचीही नोंद करता येईल. तसेच मदतीसाठी १०७७ ( टोल फ्री), ०२४१-२३२३८४४ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



