Protest demonstration demanding water : प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर माळेगाव-ने येथील ‘घेराव आंदोलन’ दुसऱ्या दिवशी ‘स्थगित’

Protest demonstration demanding water : प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर माळेगाव-ने येथील 'घेराव आंदोलन' दुसऱ्या दिवशी 'स्थगित'

0
Protest demonstration demanding water : प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर माळेगाव-ने येथील 'घेराव आंदोलन' दुसऱ्या दिवशी 'स्थगित'
Protest demonstration demanding water : प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर माळेगाव-ने येथील 'घेराव आंदोलन' दुसऱ्या दिवशी 'स्थगित'

Protest demonstration demanding water : शेवगाव : पाणलोट क्षेत्रातील (Watershed Area) सात बंधारे, तलाव व नालाबंडिंग वर्षातून सहा वेळा पाण्याने समृद्ध करावेत, या मुख्य मागणीसाठी माळेगाव-ने (ता. शेवगाव) येथील शेतकरी, महिला व युवकांनी ताजनापूर लिफ्ट योजनेच्या पाण्यासाठी सुरू केलेले घेराव आंदोलन (Protest demonstration demanding water) दुसऱ्या दिवशी उशिरा प्रशासनाच्या (Administration) लेखी आश्वासनानंतर मागे न घेता ‘स्थगित’ करण्यात आले आहे.

दोन बंधाऱ्यासाठी शुक्रवारी पाणी सोडणार

‘ताजनापूर लिफ्ट योजने’चे जनक ॲड. शिवाजीराव काकडे, जि.प च्या माजी सभापती हर्षदा काकडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (२४ ऑगस्ट) सकाळपासून सुरू झालेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांनी संपूर्ण रात्र कार्यालय परिसरातच व्यतीत केली. तेथेच स्वयंपाक करून जेवण केले. रात्रभर अभंग, हरिपाठ आणि भजनाच्या माध्यमातून आंदोलनाची धग कायम ठेवली गेली. मंगळवारी सकाळी आंदोलकांनी प्रथम उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसराची स्वच्छता करत प्रशासनाला एक अनोखा व सनदशीर संदेश देत दिवसभर कार्यालय परिसरात ठाण मांडले. दुपारचे जेवण देखील तेथेच करत भजने व अभंग गायली.

पूर्वीच्या मंजुरीतील दोन बंधाऱ्यात पाणी सोडले (Protest demonstration demanding water )

आंदोलनाची वाढती धग आणि शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहून अहिल्यानगर येथून कार्यकारी अभियंता जगदीश पाटील आंदोलनस्थळी पोहचले. आंदोलक आणि प्रशासनांमध्ये काही चर्चेच्या फेऱ्या झाल्यानंतर जलसंपदा विभागाने अखेर प्रशासकीय पातळीवर महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यानुसार यांत्रिकी विभागाचे अपुर्ण काम पूर्ण करून येत्या शुक्रवारी (२८ ऑगस्ट) पूर्वीच्या मंजुरीतील दोन बंधाऱ्यात पाणी सोडले जाईल आणि उर्वरित पाच पाणलोट क्षेत्राच्या सर्वेक्षण कामासाठी ताजनापूर उपसा सिंचन योजनेतील फेरनियोजनातील शिल्लक पाण्याचा वापर करून अंदाजपत्रक मंजुरीचा प्रस्ताव १० सप्टेंबर २०२६ पर्यंत वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात येईल. सर्वेक्षणाच्या कामाला सक्षम स्तरावरून मंजुरी घेऊन निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाईल. कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतरच्या तीन महिन्यांच्या आत हे सर्वेक्षण काम पूर्ण केले जाईल. सदर सर्वेक्षणाचा सविस्तर अहवाल प्राप्त झाल्यानंतर या योजनेचा ‘डीपीआर’ पुढील मंजुरीसाठी शासनाकडे सादर करण्यात येईल असे लेखी आश्वासन अहिल्यानगर मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील यांनी दिले.

Protest demonstration demanding water
Protest demonstration demanding water

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

प्रशासनाकडून निश्चित वेळेची मर्यादा आखून देत लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन पूर्णपणे मागे न घेता केवळ ‘स्थगित’ करत असल्याची घोषणा ॲड.काकडे यांनी आंदोलकांच्या वतीने केली. यावेळी ‘ताजनापूर’चे उपविभागीय अधिकारी श्रीहरी कुलकर्णी, कार्यकारी अभियंता (यांत्रिकी विभाग) दत्तात्रय गुळमकर, उपअभियंता (यांत्रिकी विभाग) अविनाश आव्हाड व इतर कर्मचाऱ्यांसह ज्येष्ठ नेते जगन्नाथदादा गावडे, लक्ष्मण गवळी, देविदास गिऱ्हे, भाऊसाहेब सातपुते, अशोक ढाकणे, रामजी पोटफोडे, भारत भालेराव, आणि माळेगाव ने व तालुक्यातील विविध गावातील शेतकरी, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंदोलन मागे नाही, फक्त स्थगित
प्रशासनाकडून निश्चित मुदतीचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन पूर्णपणे मागे न घेता केवळ ‘स्थगित’ करण्यात आले आहे. माळेगावच्या शेवटच्या पाणलोट क्षेत्रात पाणी येई पर्यंत पाठपुरावा करतच राहणार.
ॲड.शिवाजीराव काकडे.