Supriya Sule’s Emotional Post : प्रिय दादा… सुप्रिया सुळे यांची स्व. अजित पवार यांच्याबाबत भावूक पोस्ट

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे डोळे पाणावणारी पोस्ट

0
Supriya Sule's Emotional Post : प्रिय दादा... सुप्रिया सुळे यांची स्व. अजित पवार यांच्याबाबत भावूक पोस्ट
Supriya Sule's Emotional Post : प्रिय दादा... सुप्रिया सुळे यांची स्व. अजित पवार यांच्याबाबत भावूक पोस्ट

Supriya Sule’s Emotional Post : नगर : देशभरात आज (ता. २८) रक्षाबंधनाचा (Raksha Bandhan) सण उत्साहात साजरा केला जात आहे. श्रावण पौर्णिमेला साजरा होणारा हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेम, विश्वास आणि जिव्हाळ्याचे प्रतीक मानला जातो. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिवंगत अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबत एक भावूक पोस्ट केली आहे.

नक्की वाचा : लेखकांमधील संवेदनशीलतेमुळे साहित्य समृद्ध : सुनेत्रा पवार

भाऊ-बहिणीचं नातं आणि कौटुंबिक जिव्हाळा हा कायम चर्चेचा विषय

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे राजकीयदृष्ट्या वेगवेगळ्या गटात गेले. मात्र, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातील भाऊ-बहिणीचं नातं आणि कौटुंबिक जिव्हाळा हा कायम चर्चेचा विषय राहिला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. बारामती विमानतळावर उतरताना झालेल्या या भीषण अपघातात त्यांच्यासह इतर 5 जणांचाही मृत्यू झाला. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी आज रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर डोळे पाणावणारी पोस्ट केली आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

सुप्रिया सुळे यांची भावूक पोस्ट (Supriya Sule’s Emotional Post)

“आज राखीपौर्णिमा…पण यावेळी तू सोबत नाहीस, ही जाणीव मनाला खूप अस्वस्थ करत आहे. सात महिन्यांपूर्वीची ती भीषण सकाळ आणि तुझं अचानक निघून जाणं…यावर आजही विश्वास बसत नाही, अशी भावूक प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. लहानपणापासून एकत्र वाढताना आपली भांडणं, एकमेकांवरचं प्रेम आणि एकमेकांविषयीचा अभिमान हाच आपल्या नात्याचा पाया होता. आजही वाटतं, तू कुठूनतरी अचानक येशील, राखी बांधून घेशील, बहिणींसोबत गप्पागोष्टी करत पुन्हा कुटुंबात रमून जाशील…तुझ्या नसण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणारी नाही. तू जिथे असशील, तिथून तुझं प्रेम आणि आशीर्वाद असेच सदैव पाठीशी राहू दे”…अशी पोस्ट सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर केली आहे.