Accident : शिक्षकाच्या कारने ६ विद्यार्थ्यांना चिरडले; श्रीरामपूर तालुक्यातील घटना

घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण

0
Accident : शिक्षकाच्या कारने ६ विद्यार्थ्यांना चिरडले; श्रीरामपूर तालुक्यातील घटना
Accident : शिक्षकाच्या कारने ६ विद्यार्थ्यांना चिरडले; श्रीरामपूर तालुक्यातील घटना

Accident : नगर : श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव-ब्राम्हणगाव रस्ता परिसरात गुरुवारी (ता. २७) एक धक्कादायक घटना घडली. शाळा सुटल्यानंतर रस्त्याने घरी जाणार्‍या सहा विद्यार्थ्यांना एका भरधाव कारने जोरदार धडक दिली. या अपघातात (Accident) जिल्हा परिषद शाळेचे सहा विद्यार्थी जखमी झाले असून, सर्व जखमींना उपचारासाठी लोणी येथील ग्रामीण रुग्णालयात (Rural Hospital) दाखल करण्यात आले आहे. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर (Critical Condition) असल्याची माहिती समोर आली आहे.

नक्की वाचा : प्रिय दादा… सुप्रिया सुळे यांची स्व. अजित पवार यांच्याबाबत भावूक पोस्ट

ग्रामस्थांची घटनास्थळी धाव

मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी (ता. २७) सायंकाळी ब्राह्मणगाव वेताळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी रस्त्याने आपल्या घरी जात होते. त्याचवेळी माळेवाडीकडून श्रीरामपूरकडे जाणार्‍या माळेवाडी येथील महाविद्यालयातील एका शिक्षकाच्या कारने जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की, काही विद्यार्थी रस्त्यावर फेकले गेले. अपघातानंतर घटनास्थळी एकच आक्रोश झाला. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, जखमी विद्यार्थ्यांना श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासनाने घटनास्थळी भेट दिली असून परिसराची पाहणी केली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

हे विद्यार्थी जखमी (Accident)

प्राथमिक उपचारानंतर सर्व जखमी विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी लोणी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघातात केशव आकाश बर्डे (वय 6), आकांक्षा आकाश बर्डे (वय 9), वैभव अमोल बर्डे (वय 6), प्रीती अमोल बर्डे (वय 8), प्रांजल बाळासाहेब तोरणे (वय 7) आणि श्रद्धा बाळासाहेब तोरणे (वय 12) हे विद्यार्थी जखमी झाले आहेत. यातील केशव आकाश बर्डे आणि वैभव अमोल बर्डे हे दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.