
Anna Hazare : ज्येष्ठ समाजसेवक पद्मविभूषण अण्णासाहेब हजारे (Anna Hazare) यांची रुग्णालयात जाऊन जलसंपदा तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांबाबतही त्यांनी डॉक्टरांकडून माहिती जाणून घेतली.
अण्णा हजारे यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपुस
ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांची तब्येत बिघडल्यामुळे पुढील उपचारांसाठी त्यांना मुंबई येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंत्री विखे पाटील यांनी तातडीने रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची माहिती जाणून घेत उपचारांबाबत डॉक्टरांशीही चर्चा केली. यापूर्वी मंत्री विखे पाटील यांनी राळेगणसिद्धी येथे जाऊन अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपुस केली होती.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
अण्णांच्या उपचारांबाबत रुग्णालय प्रशासनाला सूचना (Anna Hazare)
काल त्यांच्या तब्येतीत अचानक बिघाड झाल्याने मुंबई येथे हलविल्याचे वृत्त कळल्यानंतर, मंत्री विखे पाटील यांनी तातडीने रुग्णालयात जाऊन अण्णांच्या उपचारांबाबत रुग्णालय प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.


